दीर्घकालीन वैद्यकीय सेवापरंपरेचा वारसा लाभलेल्या या संस्थेचे नेतृत्व डॉ. अमोघ लक्ष्मण जंबगी करत असून, डॉ. लक्ष्मण जंबगी व डॉ. वर्षा जंबगी यांच्या तीन दशकांच्या रुग्णसेवेचा अनुभव या नव्या उपक्रमामागे भक्कम आधार म्हणून उभा आहे.
“मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही, बेळगावीकरांना अत्याधुनिक नेत्रसेवा त्यांच्या स्वतःच्या शहरात मिळाली पाहिजे,” असे मत डॉ. अमोघ जंबगी यांनी व्यक्त केले.
सुमारे ३५,००० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या अत्याधुनिक रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध असतील:
मोतीबिंदू (कॅटरॅक्ट) शस्त्रक्रिया
कॉर्निया व रेटिना उपचार
ग्लॉकोमा व्यवस्थापन
बाल नेत्ररोग सेवा
ऑक्युलोप्लास्टी
न्युरो-ऑफ्थल्मोलॉजी
रिफ्रेक्टिव्ह (चष्मामुक्ती) शस्त्रक्रिया
स्वतंत्र ड्राय आय व कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक
या भागात प्रथमच उपलब्ध होणारी रोबोटिक 4D फेको कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया व चष्मामुक्तीसाठी ZEISS MEL 90 एक्सायमर लेझर प्रणाली हे या संस्थेचे वैशिष्ट्य ठरणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रिया अधिक अचूक, सुरक्षित आणि जलद पुनर्प्राप्ती देणाऱ्या ठरतील.
डॉ. अमोघ जंबगी यांच्यासोबत विविध उपविभागांमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत राहणार आहे. यामध्ये डॉ. जगदीश पाटील, डॉ. हेमंत, डॉ. स्नेहा बंडुर्गे आणि डॉ. मिताली शहा यांचा समावेश असून, रुग्णांसाठी २४ तास अखंड सेवा उपलब्ध राहील.
रुग्णसेवेच्या मूल्यांशी बांधिलकी जपत, ही संस्था भविष्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त करत आहे. उद्घाटन सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असून, बेळगावी व परिसरासाठी हा आरोग्यसेवेतील नवा अध्याय मानला जात आहे.
Also read









