Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ*

मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ
मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 7मार्च 2026रोजी सदिच्छा समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी 'पाखरांनो घ्या उंच भरारी'या प्रेरणा गीताने केली. यासाठी संगीत शिक्षक सहदेव कांबळे व नारायण गणाचारी यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी सान्वी मंडोळकर हिने केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी प्रा.प्रसाद वाडेकर उपस्थित होते.शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील उपस्थित होते. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थिनी आदिती शिंदे हिने प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पाचवीचे विद्यार्थी श्रीषा बिर्जे व हर्ष पावशे यांनी आपले विचार व्यक्त केले. यानंतर सोहम हळदणकर, अनुष्का पाटील,श्रेया घोळसे, श्रावणी राजगोळकर,स्वरा पाटील, स्नेहा हिरोजी, श्रेया भातकांडे, अनिकेत जाधव या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेप्रती कृतज्ञतापर मनोगत व्यक्त केले. यश म्हणजे नवीन गोष्टी शिकणे,नवी स्वप्ने बघणं, संकटांना सामोरे जाणे, योग्य निर्णय घेणे, शिस्त, सवयी,नियोजन हे समजावण्यासाठी उदाहरणे देऊन तसेच माजी विद्यार्थी नाळ जपून ठेवल्याबद्दल शाळेचे आभार मानले तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडवल्याबद्दल प्रमुख पाहुण्यांनी प्रा.प्रसाद वाडेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये आभार व्यक्त केले.मुलांना ध्येयापर्यंत जाण्यासाठी समर्पक असा संदेश शाळेतील शिक्षिका शैला पाटील यांनी दिला. शाळेने दिलेली शिदोरी पुढे घेऊन जाणे, प्रामाणिकपणे प्रयत्न करणे तसेच कोणतेही यश गाठत असताना मनापासून प्रयत्न करणे असे अध्यक्षीय मनोगतात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर व शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील यांनी विचार मानले व दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या.माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून बक्षीसांची घोषणा केली. आदर्श विद्यार्थी म्हणून सोहम सतीश हळदणकर व‌ आदर्श विद्यार्थिनी म्हणून स्नेहा यल्लाप्पा हिरोजी यांची निवड करण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला शैक्षणिक साहित्यासाठी देणगी दिली. सूत्रसंचालन‌ व आभार पाचवीच्या विद्यार्थिनी आदिती परमोजी व अवधूत देवळी यांनी केले. कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मंजुषा पाटील व शाहीन शेख या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील , शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत,दहावीचे शिक्षक बी.एम्.पाटील,इंद्रजीत मोरे, सविता पवार ,सुरेश कुंदेकर, शिल्पा गर्डे,डी.एस्.मुतकेकर व सर्व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन विद्यार्थी रोहित पाटील याने केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*