Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतन शाळेचा गौरव*

बेळगाव : 'मायेचा एक घास भारतीय जवानांसाठी' या उपक्रमांतर्गत आयोजित राज्यस्तरीय ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत मराठी विद्यानिकेतन बेळगाव शाळेतील २११ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत महाराष्ट्रातील १६००० स्पर्धकांसोबत यश संपादन केले. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेचा गौरव दिनांक 18 एप्रिल रोजी करण्यात आला.

देशभक्तीचा संस्कार शालेय जीवनात होणे गरजेचे आहे. आदर्श नागरिक निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमांची निश्चितच गरज आहे. याच उद्देशाने शाळेने या दैदिप्यमान अशा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला.आधार सोशल ट्रस्ट, धायरी (पुणे) यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील स्वरा आलगोंडी या सहावीतील विद्यार्थिनीचा सोळा हजार शुभेच्छा पत्रातून उत्तेजनार्थ क्रमांक आला.

शिक्षिका माधुरी पाटील व स्नेहल‌ पोटे यांनी प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. पुरस्कारामध्ये शाल,प्रशस्तीपत्र , कृतज्ञता पत्र व सन्मानचिन्ह यांचा समावेश होता. या यशाबद्दल शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील,शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले,स्पर्धा विभाग प्रमुख माया पाटील यांनी अभिनंदन केले. शाळेच्या वतीने हा उपक्रम मुख्याध्यापक बी.जी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यात शिक्षिका दीप्ती कुलकर्णी, कमल पाटील, जयश्री पाटील, मुक्ता आलगोंडी, स्नेहल पोटे आदींनी सहभाग नोंदविला.

"आधार सोशल ट्रस्टने फक्त कार्यक्रम नाही केला तर एक संस्कार घडवला आहे

हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे जवानांसाठी ग्रीटिंग कार्ड्स या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रसंस्कार रुजवणारा, सैनिक व विद्यार्थी,शिक्षक पालक, संस्था यांना जोडणारा सेतू, देशभक्तीची ज्योत पेटवणारा, प्रेरणादायी सोहळाच होता.कार्यक्रमाचे पाहुणे ज्यांच्यामुळे ज्ञान, संस्कार आणि साहित्यिक उंची लाभली असे आदरणीय एकनाथ आव्हाड यांचे मार्गदर्शन प्रेरणादायी होते.या संस्थेचे संस्थापक ज्यांच्या या महान कार्यामागे ध्यास, स्वप्न व सामाजिक बांधिलकीतून हा महान कार्य उभा राहिला असे संतोष चाकणकर प्रेरणास्थान आहेत. बीएसएफचे जवान जे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा विषय आहे असे तसेच ज्यांच्या उपस्थितीने आपल्या मनात देशभक्तीची ऊर्जा निर्माण झाली . राज्यभरातील शिक्षक, विद्यार्थी, स्पर्धक,समन्वयक या सर्वांना एकत्र ठेवून भव्य कार्यक्रम उभा करण्यात आला. सर्वांनी दिलेली शुभेच्छा कार्ड्स सीमेवरील जवानांपर्यंत पोहोचवण्यात आली.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*