Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*वृत्तपत्र विक्रीतून उभारलेल्या निधीने 500 हून अधिक विद्यार्थ्यांना दिला आधार*

बेळगाव : शांताई  विद्याधार संस्था गेल्या 12 वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाची साथ देण्याचे उल्लेखनीय कार्य सातत्याने करत आहे. वृत्तपत्र विक्रीतून जमा होणारा निधी या सेवाभावी उपक्रमाचा पाया असून, संस्थेने आजवर देशभरातील 500 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली आहे.

मंगळवारी उद्दमबाग परिसरातील एका हॉटेलमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी भोजनासाठी थांबलेल्या वेळी, त्यांची नजर ग्राहकांना विनम्रतेने सेवा देणाऱ्या श्रेयश वाघमारे या तरुणावर गेली. त्याचा नम्र स्वभाव, मेहनती वृत्ती आणि जबाबदारीने केलेली सेवा पाहून ते प्रभावित झाले.

विचारपूस केली असता श्रेयश हा गोमटेश PU कॉलेजचा बुद्धिमान विद्यार्थी असून, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाइम वेटर म्हणून काम करतो, हे उघड झाले. त्याच्या जिद्दीने प्रभावित झाल्यानंतर विजय मोरे यांनी अलान विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांच्याशी चर्चा करून त्याला तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला.

यानंतर शांताई विद्याधार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गोमटेश शिक्षणसंस्थेला भेट देत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. संस्थेतर्फे श्रेयशच्या शैक्षणिक मदतीचा धनादेश अलान विजय मोरे आणि गंगाधर पाटील यांनी महाविद्यालयीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

श्रेयश एका एकल पालक कुटुंबातून येतो. त्याची आई उडुपाबाग परिसरात छोटा खानावळ व्यवसाय चालवते; दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवताना तिला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. संस्थेच्या मदतीमुळे या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, श्रेयशच्या शिक्षणाची वाट अधिक सुलभ झाली आहे.

समाजाच्या सहभागातून शिक्षणाचा उजेड वंचितांपर्यंत पोहोचवण्याचे काम शांताई विद्याधार संस्था गेली बारा वर्षे यशस्वीपणे करत असून, या उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजळले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*