LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*डी. वाय. पाटील यांचे निधन; शिक्षण आणि समाजसेवेत मोलाचे योगदान*


मुंबई : शिक्षण, आरोग्य आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशभरात वेगळी ओळख निर्माण करणारे पद्मश्री डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

२२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षणाचा प्रसार हे ध्येय ठेवून १९८३ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत त्यांनी शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे केले. आज डी. वाय. पाटील समूहा अंतर्गत विद्यापीठे, वैद्यकीय, अभियांत्रिकी, व्यवस्थापन आणि इतर उच्च शिक्षण संस्था कार्यरत आहेत.

शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पुणे, कोल्हापूर आणि नवी मुंबई येथील शैक्षणिक संकुले देशातील अग्रगण्य संस्थांमध्ये गणली जातात.

सार्वजनिक जीवनातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.

शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरविले होते.

'शिक्षणसम्राट' आणि 'दादा' या नावाने सर्वपरिचित असलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षणविश्वातील एक दूरदृष्टीचा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी मोराचे रेस्क्यू; सोशल वर्कर टीमची तत्परता‘बेळगावच्या राजा’च्या दर्शनासाठी उत्तर परिक्षेत्राचे IG संदीप पाटील दाखल; मंडळाकडून स्वागत*बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांसाठी पोलिसांचा ॲक्शन प्लॅन; विसर्जनावर विशेष लक्ष**गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात RAF चे पथसंचलन; सुरक्षा व्यवस्था कडक**तंजावर साहित्य संमेलनासाठी बेळगावचा ३० जणांचा चमू सज्ज! यश ॲटो येथे शुभेच्छा कार्यक्रम; रायगड व राजगड टीम २१ सप्टेंबरला रवाना**यल्लम्मा देवीच्या डोंगरावर दुकानांवर धाडी; औषधांची विक्री आणि निकृष्ट खाद्यपदार्थ उघड**सारथी नगर, पोलीस कॉलनीत ₹1.25 कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात; लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांना यश**शाहूनगरात विघ्नहर्ताच्या महाआरतीचा सोहळा; संदेश राजमाने यांचा मंडळाकडून सन्मान*देवस्थान संस्कृतीने जगाला आकर्षित केलेले भव्य राष्ट्र भारत : मनोहरजी मठदकर्नाटकातील विद्यार्थ्यांना दसऱ्याची १९ दिवसांची सुटी; २२ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू