LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*गरजू विद्यार्थ्यांसाठी रोटरी क्लब बेलगाम साऊथचा हातभार*

बेळगांव : सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला बळ देण्याचा उपक्रम म्हणून Rotary Club of Belgaum South यांच्या वतीने ठळकवाडी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळे, प्रा. प्रणव पित्रे, ज्येष्ठ रोटेरियन विनय बेहरे तसेच रोटेरियन कामत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात इंटरॅक्ट क्लबचे शिक्षक एस. एस. कोष्टी यांच्या प्रास्ताविकाने झाली. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
यावेळी डॉ. गोविंद मिसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिस्त, उत्तम आरोग्य, वेळेचे योग्य नियोजन आणि अभ्यासातील सातत्य यांचे महत्त्व अधोरेखित केले. “विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या बळावर आपल्या कुटुंबासह समाज आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,” असे त्यांनी आवाहन केले. विनय बेहरे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.

या उपक्रमांतर्गत आई किंवा वडील नसलेल्या 16 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवान अशा 17 विद्यार्थ्यांना शालेय फी भरण्यासाठी प्रत्येकी 2900 रुपये रोख स्वरूपात देण्यात आले. एकूण 33 विद्यार्थ्यांना या माध्यमातून शैक्षणिक मदत मिळाली.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक आणि रोटरी सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन के. एम. गुरव यांनी केले.
शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत, यासाठी रोटरी क्लबचा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*