कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर यांनी भूषविले.
यावेळी इंटरॅक्ट क्लब ऑफ बेलगाम साउथचे अध्यक्ष डॉ. गोविंद मिसाळ, युथ डायरेक्टर प्रा. सविनय चिमणगौवडर आणि रोटरियन आरती अंगडी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांसाठी आयोजित विविध खेळ व उपक्रमांचा शुभारंभ झाला. सहशिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सी. वाय. पाटील यांनी केले, तर संजीव एस. कोष्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Also read









