LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने रचला इतिहास; तब्बल ४२ तासांनी उत्सवाची सांगता

बेळगाव : यंदाच्या गणेशोत्सवात बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने ऐतिहासिक नोंद केली. शुक्रवारी दुपारी सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल ४२ तास अखंड सुरू राहिल्यानंतर रविवारी दुपारी साडेबारा वाजता समाप्त झाली. अखेर महानगरपालिकेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करून यंदाच्या गणेशोत्सवाला औपचारिक निरोप देण्यात आला.

बेळगावच्या रस्त्यांवर गणेशभक्तांचा अक्षरशः जनसागर पाहायला मिळाला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते. विविध गणेश मंडळांच्या मिरवणुका, आकर्षक देखावे आणि भक्तिमय वातावरणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण कायम होते.

‘बेळगाव राजा’च्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

‘बेळगाव राजा’च्या विसर्जनावेळी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर जमा झाले होते. राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली. आरती आणि अभिषेकानंतर ‘पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात बेळगावच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.

यानंतर भव्य गणेशमूर्तींचे कपिलेश्वर तलाव येथे विधिवत विसर्जन करण्यात आले. विसर्जनस्थळी प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती.

४२ तास प्रशासनाची अखंड सेवा

विसर्जन मिरवणूक सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी पोलीस खाते, महानगरपालिका तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी सलग कार्यरत होते. दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या कामाचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी कौतुक केले.

गणेशमूर्तींची मोठी उंची आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे मिरवणुकीला विलंब झाल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षी विसर्जन मिरवणुकीचा कालावधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

अखेर महापालिकेच्या गणपतीचे विसर्जन

सलग ४२ तास चाललेल्या या ऐतिहासिक मिरवणुकीच्या अखेरीस बेळगाव महानगरपालिकेच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.

भक्ती, उत्साह, परंपरा आणि प्रशासनाच्या समन्वयातून पार पडलेल्या या विसर्जन मिरवणुकीने बेळगावच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा एक वेगळा अध्याय नोंदवला.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*SIR विरोधात बेळगावमध्ये काँग्रेसचे आंदोलन; निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी**कै. लक्ष्मीबाई नारायण देसुरकर यांचे निधन**जिल्हास्तरीय मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराला विजेतेपद**ॲड. सुधीर चव्हाण यांचा तंजावर साहित्य संमेलनात राजेंच्या हस्ते सत्कार**बस्तवाडच्या अल्पसंख्याक वसाहतीसाठी २.५१ कोटींचा निधी; सीसी रस्ता व गटार कामांना सुरुवात**पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश; पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड**मारिहाळ कृषी सहकारी संघाची दमदार कामगिरी; ११९ कोटींची उलाढाल, ७१.६० लाखांचा नफा**गणेश विसर्जनानंतर येळ्ळूरमध्ये स्वच्छता अभियान; विराट गल्लीच्या विघ्नेश्वर मंडळाचा पुढाकार*बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने रचला इतिहास; तब्बल ४२ तासांनी उत्सवाची सांगता*भक्ती, उत्साह आणि मराठा परंपरेच्या साक्षीने बेळगावात लष्करी केंद्राचा गणेश विसर्जन सोहळा*