LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*ॲड. सुधीर चव्हाण यांचा तंजावर साहित्य संमेलनात राजेंच्या हस्ते सत्कार*

तंजावर : ऐतिहासिक तंजावर नगरीत नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या सरफोजीराजे भोसले द्वितीय मराठी साहित्य संमेलनात अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांचा संमेलनाचे उद्घाटक छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपण्यासाठी आयोजित या संमेलनाला महाराष्ट्रासह कर्नाटक व दक्षिण भारतातील साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. बेळगावहून तब्बल ४० साहित्यप्रेमींचे शिष्टमंडळ या संमेलनासाठी तंजावर येथे सहभागी झाले होते. तंजावरच्या मराठी परंपरेचा गौरव, तसेच सरफोजीराजे भोसले द्वितीय यांच्या साहित्य, कला, शिक्षण व सांस्कृतिक योगदानाचे स्मरण या संमेलनातून करण्यात आले.

ॲड. सुधीर चव्हाण यांनी संमेलनात ग्रंथदिंडीचे प्रमुख पाहुणे म्हणून सहभाग घेतला. बेळगावच्या साहित्यप्रेमींसोबत ते संमेलनाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले. कुशल संघटक म्हणून कार्यरत असलेल्या ॲड. चव्हाण यांच्या साहित्यिक व सामाजिक योगदानाची दखल घेत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील आणि उद्योजक आप्पासाहेब गुरव हे विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे बेळगावच्या साहित्यिक प्रतिनिधित्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

संमेलनाध्यक्ष डॉ. शरद गोरे, स्वागताध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे, निमंत्रक युवराज संभाजीराजे भोसले यांच्यासह विविध मान्यवर, साहित्यिक, लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या संमेलनासाठी बेळगावहून सहभागी झालेल्या साहित्यप्रेमींमध्ये विलास पवार, रमेश भोसले, संजय गुरव, मोहन पाटील सर, मोहन मन्नोळकर, नंदन पाटील, विलास बेळगावकर, के. आर. मोटर, नितीन आनंदाचे आणि शशिकांत अष्टेकर यांचा समावेश होता.

तंजावरच्या ऐतिहासिक भूमीत छत्रपती बाबाजीराजे भोसले यांच्या हस्ते झालेला हा सन्मान ॲड. सुधीर चव्हाण यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्याला मिळालेली प्रेरणादायी दाद ठरली. तसेच बेळगाव आणि तंजावर यांच्यातील मराठी साहित्यिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हे संमेलन महत्त्वपूर्ण ठरले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*SIR विरोधात बेळगावमध्ये काँग्रेसचे आंदोलन; निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी**कै. लक्ष्मीबाई नारायण देसुरकर यांचे निधन**जिल्हास्तरीय मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत बेळगाव शहराला विजेतेपद**ॲड. सुधीर चव्हाण यांचा तंजावर साहित्य संमेलनात राजेंच्या हस्ते सत्कार**बस्तवाडच्या अल्पसंख्याक वसाहतीसाठी २.५१ कोटींचा निधी; सीसी रस्ता व गटार कामांना सुरुवात**पंडित नेहरू पदवी पूर्व महाविद्यालयाच्या कुस्तीपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत दैदिप्यमान यश; पाच खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड**मारिहाळ कृषी सहकारी संघाची दमदार कामगिरी; ११९ कोटींची उलाढाल, ७१.६० लाखांचा नफा**गणेश विसर्जनानंतर येळ्ळूरमध्ये स्वच्छता अभियान; विराट गल्लीच्या विघ्नेश्वर मंडळाचा पुढाकार*बेळगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीने रचला इतिहास; तब्बल ४२ तासांनी उत्सवाची सांगता*भक्ती, उत्साह आणि मराठा परंपरेच्या साक्षीने बेळगावात लष्करी केंद्राचा गणेश विसर्जन सोहळा*