बेळगांव ता, 28.टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित जिल्हास्तरीय प्राथमिक व माध्यमिक मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेत
बेळगाव शहराने चार गटाचे विजेतेपद पटकावित वर्चस्व सिद्ध केले
प्राथमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत सेंट झेवियर्स स्कूल बेळगाव शहरने सेंट फ्रान्सिस स्कूल उचगाव बेळगाव ग्रामीण शाळेचा 1-0,असा पराभव केला विजयी संघाच्या फौजान शेखने एक गोल केला.
प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सेंट जोसेफ बेळगाव शहरने सेंट जोसेफ संतीबस्तवाड बेळगाव ग्रामीणचा 2-0 असा पराभव केला.माध्यमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत सेंट झेवियर्स बेळगाव शहरने सेंटजोसेफ संती बस्तवाड बेळगाव ग्रामीणचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या श्रद्धा पाटील एकमेव गोल केला.
माध्यमिक मुलांच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा अनगोळ बेळगाव शहरने सर्वोदय स्कूल खानापूरचा 1-0 असा पराभव केला विजयी संघाच्या समर्थ पनारीने पेनल्टी शूटआउटवर एकमेव गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रीय शरीरसौष्ठव खेळाडू प्रणय शेट्टी, शिवाजी कॉलनी फुटबॉल संघटनेचे पवन कांबळे संतोष दळवी प्राथमिक शारिरीक शिक्षक सघटनेचे अध्यक्ष रमेश सिंगद, जयसिंग धनाजी प्रवीण पाटील बापु देसाई
चंद्रकांत पाटील महेश हगीदळी, उमेश मजुकर, हर्ष रेडेकर, सुनिता जाधव ज्युलेट फर्नांडिस,येस्तारानी, आय एम पटेल, पी एस कुरबेट,सुभाष गंभीर चंद्रशेखर तोगरी, दोडमणी, या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक प्रमाणपत्र पदक देऊन गौरवण्यात आले वरील चारी संघ आगामी होणाऱ्या विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.









