Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*वि.गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे शिक्षणातील ए.आयवर विचारमंथन*

बेळगाव:मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचा शिक्षकांशी परिसंवाद

वि.गो.साठे प्रबोधिनीतर्फे दि.4एप्रिल 2026 रोजी' मराठी माध्यम माझी यशोगाथा' या व्याख्यान सत्राच्या अंतर्गत प्रा. प्रशांत ढोपे यांचे 'ए.आय. चा शिक्षणातील वापर, परिणाम व भविष्यातील संधी' या विषयावरील व्याख्यान बेळगाव परिसरातील शिक्षकांसाठी मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी केले. मराठी माध्यमात शिकूनसुद्धा मुले पुढे जाऊ शकतात, एखादा छंद एखादी कला जोपासणे खूप महत्त्वाचे आहे. असे विचार प्रस्ताविकात मांडण्यात आले. प्रमुख पाहुण्यांची ओळख संगणक शिक्षिका पद्मजा कुऱ्याळकर यांनी करून दिली. सर्वप्रथम आंबेवाडी गावातील भगतसिंग हायस्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून यशस्वी झालेल्या प्रा. प्रशांत ढोपे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन वि.गो .साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी स्वागत केले.

शिक्षणातील ए.आयचा वापर, संधी आणि आव्हाने याबद्दल खूप सोप्या शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात मांडले. शिक्षकांसाठी ए.आय. खूप महत्त्वाचे आहे. वेळ वाचतो, अध्यापन मनोरंजनीय होते, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कामात गुंतवून ठेवता येते, प्रशासकीय कामात मदत, पालकांसाठी नोटीस तयार करणे, अहवाल आणि मूल्यमापन जलद करणे , शिक्षकांसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका, टाचण वही तयार करणे. अध्यापनात शिक्षक ए.आयचे पाच टूल्स वापरू शकतात. चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, कॅनवा मॅजिक डिझाईन, गॅमा ॲप यासारखे ॲप शिक्षकाला उपयोगी तर आहेतच शिवाय विद्यार्थ्यांनाही गृहपाठ समजून घेणे, अवघड विषय सोप्या भाषेत शिकवणे, एखादी भाषा सुधारणे, प्रोग्रामिंग शिकणे हे सोपे जाते. तर कृषी आणि आरोग्यासाठी ए .आय हा नवा कणाच आहे. पिकावर कोणता रोग पडला आहे? वगैरे शेती संदर्भात माहिती मिळवता येते. ए.आयचा वैद्यकीय क्षेत्रात वापर करून माहिती मिळविणे व उपचार करणे सुलभ झाले आहे. ही सर्व माहिती त्यांनी प्रात्यक्षिकातून शिक्षकांना दाखवली.

असाही ए .आय.
त्यांनी एक महत्त्वाची माहिती या परिसंवादात अशी सांगितली की, ए .आय हा शिक्षक बनू शकत नाही , कारण त्यात संवेदना आणि प्रेम नसतं. शिक्षक हा योग्य मार्गदर्शक, योग्य दिशादर्शक असतो. ए .आय. तुमची जागा ‌ घेऊ शकणार नाही पण ए .आय .वापरणारी व्यक्ती तुमची जागा घेऊ शकते. या युगात टिकायचं असेल तर तंत्रज्ञानासोबत आपण मैत्री केली पाहिजे. शिक्षकाची शाबासकीची थाप, कौतुकाची प्रेरणा विद्यार्थ्याला घडवते. योग्य पडताळणी करूनच ए.आय.चा योग्य वापर करणे गरजेचे आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांचे निरसन करून परिसंवाद यशस्वीपणे पार पाडला.

कार्यक्रमाला वि.गो. साठे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, प्रबोधिनीचे सचिव व मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर, उपाध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, कार्यकारिणीचे सर्व सदस्य, मराठी विद्यानिकेतन शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील,शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन मराठी विद्यानिकेतन शाळेच्या अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर यांनी केले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*