LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*भ्रष्टाचाराच्या आरोपांतील मंत्र्यांविरोधात बेळगावात भाजपचे तीव्र आंदोलन*

कर्नाटक मंत्रिमंडळाच्या अलीकडील पुनर्रचनेनंतर भ्रष्टाचाराच्या आरोपांना सामोरे गेलेल्या काही मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने बेळगावात आंदोलन छेडले.

शहरातील राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या निदर्शनातून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नाराजी व्यक्त केली. आंदोलनादरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देणे जनतेच्या विश्वासाला तडा देणारे असल्याचा आरोप करण्यात आला.

या आंदोलनात विधान परिषद सदस्य लिंगराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, माजी आमदार संजय पाटील, विश्वनाथ पाटील, महांतेश दोड्डगौडर, अरविंद पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष गीता सुतार, जिल्हा सरचिटणीस मल्लिकार्जुन मादम्मनवर, संदीप देशपांडे, धनश्री देसाई यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलनादरम्यान संबंधित मंत्र्यांना तत्काळ पदमुक्त करण्याची मागणी करत राज्य सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी भूमिका भाजपच्या नेत्यांनी मांडली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*