LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News | Crime News

शिवं असोसिएट्स प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; शिवानंद नीलण्णवर यांच्या निवासस्थानी छापा

शिवं असोसिएट्स प्रकरणात ईडीची मोठी कारवाई; शिवानंद नीलण्णवर यांच्या निवासस्थानी छापा

बेळगाव : जास्त परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून कोट्यवधी रुपये जमा केल्याचा आरोप असलेल्या शिवं असोसिएट्स प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) शिवानंद नीलण्णवर यांच्या बेळगावातील निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शुक्रवारी छापा टाकत कागदपत्रे आणि इतर संबंधित बाबींची तपासणी सुरू केली.

बेळगावातील शिवबसव नगर येथील अपार्टमेंटमध्ये असलेल्या शिवानंद नीलण्णवर यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले. घराची झडती घेण्यासोबतच आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणात यापूर्वीच संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीआयडीकडून तपास सुरू आहे. सीआयडीची चौकशी सुरू असतानाच ईडीने कारवाई केल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

कुटुंबीयांची चौकशी

ईडीच्या कारवाईदरम्यान शिवानंद नीलण्णवर यांच्या पत्नी संगीता तसेच जावई संजू यांचीही अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळुरू आणि गोवा येथील ईडी पथकातील अधिकारी या कारवाईत सहभागी झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, शिवानंद नीलण्णवर यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित ठिकाणीही ईडीकडून शोधमोहीम राबविण्यात आल्याचे समोर आले आहे.

बडाकुंद्री आणि चिकोडीतही झडती

बेळगाव जिल्ह्यातील बडाकुंद्री गावातील एका निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच चिकोडी येथील सुभाष यांच्या निवासस्थानीही शोधमोहीम राबविण्यात आल्याची माहिती आहे.

या कारवाईमुळे शिवं असोसिएट्सशी संबंधित आर्थिक व्यवहार, गुंतवणूकदारांकडून जमा झालेली रक्कम आणि संबंधित व्यक्तींमधील आर्थिक संबंध याबाबत तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.

यापूर्वी सीआयडीकडे तपास

या प्रकरणात गेल्या 15 मे रोजी बेळगाव एसी यांच्या नेतृत्वाखाली प्राथमिक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पुढील तपासासाठी हे प्रकरण सीआयडीकडे सोपविण्यात आले.

सीआयडीचा तपास सुरू असतानाच आता ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केल्याने शिवं असोसिएट्स प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, ईडीच्या कारवाईत नेमकी कोणती कागदपत्रे किंवा आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती हाती लागली, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. तपास यंत्रणांच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध**मराठी मॉडेल शाळा येळ्ळूर च्या सौ. शोभा राजाराम निलजकर यांना यावर्षीच्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला याबद्दल शाळेच्या एस.डी.एम.सी.कडून अभिनंदन सत्कार* *सर्वसमावेशक शालेय आरोग्य उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण**गणेशोत्सवात दुकाने रात्री १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी*