Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*बेळगावचा स्केटर देवेन बामणे भारतासाठी जागतिक रंगमंचावर*

बेळगाव :
बेळगाव जिल्ह्याच्या क्रीडाजगतात अभिमानाची भर टाकणारी कामगिरी करत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचा प्रतिभावान स्केटर आणि आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी देवेन बामणे याची जागतिक रोलर स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही निवड चाचणी अलीकडेच मोहाली (चंदीगड) येथे पार पडली.

स्पीड स्लालॉम या प्रकारात देवेनने उल्लेखनीय प्रदर्शन करत राष्ट्रीय पातळीवर आपले स्थान निश्चित केले असून आता तो २९ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत सिंगापूर येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

देवेनने गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने प्रशिक्षण घेतले असून, या निवडीसाठी त्याने दिवसरात्र परिश्रम घेतले. त्याच्या या यशाबद्दल बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांनी त्याचे अभिनंदन केले आणि भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

देवेनच्या यशामागे त्याचे पालक ज्योती बामणे आणि विनोद बामणे यांचे प्रेरणादायी पाठबळ असून, त्यांनी त्याला देशासाठी खेळण्यास सतत प्रोत्साहन दिले आहे.

या यशानिमित्त के.एल.ई. सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदूधर सीताराम, आर.एल.एस. कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, तसेच अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर आणि सूर्यकांत हिंडलगेकर यांनी देवेनचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*