Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*अस्मी पांड्या हिचे CBSE दहावीमध्ये 93.6% गुणांसह उज्ज्वल यश*

बेळगाव/ बंगळूर / गोवा : विशेष प्रतिनिधी : PM SHRI केंद्रीय विद्यालय INS मंडोवी, वेरम येथील विद्यार्थिनी अस्मी शिवराम पांड्या हिने CBSE दहावी (Class 10) बोर्ड परीक्षेत 93.6% गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अस्मीने विशेषतः इंग्रजी विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता अधोरेखित केली आहे. याशिवाय तिने सामाजिक शास्त्र, संस्कृत, विज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयांमध्येही उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.
अस्मी ही अभ्यासू, मेहनती आणि सातत्यपूर्ण प्रगती करणारी विद्यार्थिनी म्हणून ओळखली जाते. संपूर्ण शैक्षणिक वर्षभर तिने उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत या यशाला गवसणी घातली आहे.

ती KLE विद्यापीठाच्या संगीत शिक्षण संस्थेतील प्राध्यापिका डॉ. संगीता कुलकर्णी यांची भाची तर अर्चना पांड्या आणि तिचे वडील उद्योजक शिवराम पांड्या यांच्या कन्या आहेत. कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि स्वतःच्या जिद्दीच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे.

अस्मीच्या या यशाबद्दल शाळेचे शिक्षक, मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी तिचे अभिनंदन केले असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*