Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*प्रियांका हडपद सहित सहा विद्यार्थ्यांची देशातील प्रतिष्ठित विमानतळांवर निवड*

बेळगाव : स्कायवर्ड एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत बेळगाव शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. अकॅडमीतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रियांका हडपद हिची दिल्ली विमानतळावरील ‘आदित्य लाउंज’मध्ये, तर फलक बेपारी, फरान अली जमखंनी, चिन्मय हल्लेजोळ, सोनम प्रधान आणि नंदकिशोरी माडीवाले यांची गोवा इंटरनॅशनल एअरपोर्टवरील ‘आदित्य मीट अँड ग्रिट’ सेवांसाठी निवड झाली आहे.

या यशानिमित्त विद्यार्थ्यांचा सन्मान समारंभ स्कायवर्ड एव्हिएशन & हॉस्पिटलिटी अकॅडमीच्या गोंधळी गल्ली येथील कार्यालयात आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणपूरक संकल्पनेनुसार रोपाला पाणी घालून करण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राकेश नंदगडकर, अकॅडमीचे सीईओ विनोद बामणे, सरस्वती इन्फोटेकच्या एमडी ज्योती बामणे, तसेच टीचिंग स्टाफमधील रिचा शर्मा उपस्थित होते.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

या प्रसंगी बोलताना विनोद बामणे म्हणाले,
“या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतूनही मेहनत घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले. पूर्वी प्रादेशिक माध्यमातून शिकलेल्या या विद्यार्थ्यांनी आज चांगले इंग्रजी संवादकौशल्यही आत्मसात केले आहे. त्यांना रोजगार मिळवून देण्यात आम्ही योगदान देऊ शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे.”

पालकांनीही अकॅडमीच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत मुलांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला.
Advertisement

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बाकनूर-बडस फाट्यावर अखेर नामफलक; प्रवाशांची मोठी गैरसोय संपली**बेळगाव पोलिसांची मोठी कारवाई; 24 तासांत 29 लाखांच्या दोन कार जप्त**रामतीर्थनगरमध्ये बुडा जमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न; नागरिकांच्या आंदोलनानंतर भिंत पाडली**नितीन जाधव यांच्या हस्तक्षेपाने हिंदवाडीतील पाणी समस्या मार्गी**वाढदिवशीच बीएससी विद्यार्थिनीची आत्महत्या; बेळगाव हादरले**जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धा 2026 उत्साहात पार**मराठी विद्यानिकेतन अटल टिंकरिंग लॅबतर्फे अनोखा तंत्रज्ञानाचा कॅम्प**प्यास फाऊंडेशन ने विक्रमी वेळेत केले तलावाचे काम**बेळगावात IPL ऑनलाईन बेटिंगवर पोलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा**मोदींचा इशारा: परदेश प्रवास टाळा, सोनं खरेदी करू नका*