LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*मराठी विद्यानिकेतन मध्ये अटल टिंकरिंग विज्ञान शिबिर संपन्न*

मराठी विद्यानिकेतन मध्ये अटल टिंकरिंग विज्ञान शिबिर संपन्न 

दिनांक 22 मे 2026 रोजी मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे अटल टिंकरिंग लॅब च्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराचा सांगता समारंभ पार पडला .दरवर्षी सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम शाळेमध्ये राबविण्यात येतात. यावर्षी ही शिबिराचे आयोजन 12 मे पासून 22 मे पर्यंत करण्यातnews_1779547048_0_703.webp

 

आले होते. कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा व सृजनशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणे ,नवीन कल्पना सुचविणे व त्या प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे.नवीन तंत्रज्ञान रोबोटिक्स, बेसिक कोडींग, इलेक्ट्रॉनिक्स, तसेच 3D प्रिंटिंग अँड डिझाईनिंग यासारख्या विषयांचा समावेश होता. हँड्स ऑन लर्निंग या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतः करून बघण्याचा अनुभव मिळाला. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.  पालकांचा व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.  यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या शिक्षण समन्वयक सविता पवार तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन.सी.उडकेकर, अटल लॅब प्रमुख श्वेता सुर्वेकर आणि स्नेहा कुप्पेकर उपस्थित होत्या.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, शिक्षक समन्वयक सविता पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*