Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरव

तुर्केवाडी : राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) पुनर्परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत सांगली येथील संजय घोडावत IIT अँड मेडिकल अकॅडमीचा विद्यार्थी सार्थक पाटील याने 720 पैकी 705 गुण मिळवून देशात 14वा आणि महाराष्ट्रात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल त्याचा आजोळ असलेल्या तुर्केवाडी येथे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी आमदार राजेश पाटील यांनी सार्थकच्या यशाचे कौतुक करत, कठोर परिश्रम, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने राज्यासह परिसराचे नाव उज्ज्वल केल्याचे सांगितले. अशा गुणवंत विद्यार्थ्यांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही नवी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
डी मीडियाशी संवाद साधताना सार्थक पाटील म्हणाला, "सुरुवातीच्या NEET परीक्षेतही मला चांगले गुण मिळाले होते. मात्र पेपरफुटी प्रकरणामुळे ती परीक्षा रद्द झाली. त्यामुळे काही काळ मानसिक तणाव निर्माण झाला होता. पण आई-वडील आणि शिक्षकांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी पुन्हा नव्या जोमाने तयारी केली. त्याच मेहनतीचे आज फळ मिळाले असून देशात 14वा क्रमांक मिळाल्याचा आनंद आहे."
सार्थकचे वडील डॉ. महेश पाटील आणि आई डॉ. सुरेखा महेश पाटील हे दोघेही एमडी डॉक्टर आहेत. त्याच्या यशामागे कुटुंबीयांसह शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन असल्याचे त्याने सांगितले.
सत्कार सोहळ्यावेळी सार्थकचे आजोबा, निवृत्त शिक्षक झिमाना पाटील गुरुजी, तसेच राजीव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सार्थकचे अभिनंदन करून त्याच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.

Author
Deepak Sutar
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेळगाव वकील संघाच्या अध्यक्षपदी बी. जे. गंगाई; उपमहापौरांकडून सत्कार*माजी आमदार राजेश पाटील यांनी केला NEET टॉपर सार्थकचा गौरवसीमा लढ्याला नवी धार; मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांचा बिदर-भालकी दौराबेळगावात रस्त्यांवरील खड्ड्यांनी वाढवला अपघातांचा धोका; प्रशासनावर सवाल*मोबाईलच्या कारणावरून मित्राचा जीव घेतला; मंदिरातच घडली थरारक हत्या**सोनम वांगचूक रुग्णालयात; पत्नी गीतांजलींची औषधांबाबत स्पष्ट भूमिका**SIR सर्वेक्षणातील अडचणींबाबत किरण जाधवांची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे धाव**बेळगावातील हनुमान मंदिरात माकडाचा शांत वावर; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल**संवेदनशीलता-जीवनानुभव यांच्या मिलाफातूनच खरी कविता जन्माला येते : कवी शिवाजी शिंदे**इंडियन कराटे क्लब, बेळगाव जिल्हा क्रीडा कराटे संघटनेच्या चार विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट प्रदान*