LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
State News

*फटाक्यांच्या दुर्घटनेत दृष्टी गमावलेल्या शिवासाठी मदतीचा ओघ*

दिनांक 22 मे 2026 रोजी मुंबई मंत्रालय येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्री विशेष अधिकारी श्री मंगेश चिवटे यांची भेट घेण्यात आली.
मागील दोन महिन्या पूर्वी फटाक्यांच्या दुर्घटनेत जखमी झालेला शहापूर येथील युवक शिवा नारायण लोहार याचे दोन्ही डोळे दुर्घटनेत इजा झाली होती. त्यासाठी KLE बेळगाव येथे विविध शस्त्रक्रिया करून उपचार घेण्यात आला. शहापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री अनिल अंबरोळे यांच्या प्रयत्न  CMRF मधून पूर्ण खर्च त्या हॉस्पिटलचा देण्यात आला. त्याचा एक डोळा पूर्ण निकामी झाला आणि दुसऱ्या डोळ्यालाही सुद्धा जबर जखम असल्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबई जे जे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले होते. दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे श्री रमाकांत दादा कोंडुसकर यांनी रुग्णाच्या घरी जाऊन विचारपूस केली व त्यादरम्यान ही सर्व बाबी मुंबईला जाण्याचे कळवले व आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुंबईला कसे जाणे आणि तो खर्च परवडेल काय असा प्रश्न रुग्णाच्या घरच्यांना पडला असता रमाकांत दादांनी विलंब न लावता आपल्या कार्यकर्त्यांना व आपटेकर यांना मुंबईला लवकरात लवकर त्यांना उपचारासाठी नेण्यासाठी सांगितले आणि काय आर्थिक खर्च आल्यास आपण मदत करू असे सांगून धीर दिले. दादांच्या प्रयत्नाने मुंबई येथे त्याची पुन्हा उपचार सुरू झाले .मुंबई जेजे हॉस्पिटल ला भेट देऊन तिथं पूर्ण पुन्हा एकदा रुग्णाचे तपासणी करण्यात आली. तपासा दरम्यान लवकरात लवकर त्यावर उपचार झाल्यास थोडी दृष्टी त्याच्या एका डोळ्याने दिसेल असे उपचारादरम्यान कळल्यानंतर  डॉक्टरांनी ( L V Eye Hospital  ) एल व्ही आय हॉस्पिटल हैदराबाद तेथील डॉक्टर श्री सायन बसू (भारतातील नामवंत डॉक्टर)  या डॉक्टरांना पुढील तपासणी करून घेण्यासाठ सांगितले. परंतु या हॉस्पिटलच्या डॉक्टरांची सहज अपॉइंटमेंट मिळणे कठीण होतं म्हणून श्री मंगेश सर यांचे भेट घेऊन सर्व माहिती दिल्यावर त्यांनी त्वरित हैदराबाद येथे थेट हॉस्पिटलला संपर्क साधून अपॉइंटमेंट विषयी चर्चा केली. दिनांक 23 रोजी हैदराबाद हॉस्पिटल चा अधिकृत अपॉइंटमेंटचा मेसेज मिळाला. सोमवार दिनांक 25 रोजी दुपारी 1.00 वा रुग्णाच्या अपॉइंटमेंट ची वेळ निश्चित झाली. श्री मंगेश सर यांचा एक फोन आनि थेट मदत रुग्णाला अपॉइंटमेंट करिता भेटली त्याबद्दल त्यांचे कौतुक व आभार केले. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या ब्रीद वाक्याचे कृतीमध्ये बघायचे असेल तर निश्चित श्री मंगेश भाऊंच्या कार्यातून दिसते. मंगेश भाऊ यांनी हैदराबाद येथील हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे संपर्क करून बेळगाव सीमा भाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांच्याशी पुढील उपचारा साठी संपर्क करतील असे डॉक्टरांना सांगितले. या भेटी प्रसंगी प्राचार्य आनंद आपटेकर वैद्यकीय समन्वय सीमाभाग बेळगाव ,(रुग्ण) शिवा नारायण लोहार , सत्यम कोणेरी, आकाश पाटील, पवन धामणेकर उपस्थित होते.
शिवा नारायण लोहार या रुग्णाला हैदराबाद येथे सोमवार दिनांक 25 रोजी पुढील तपासणीसाठी नेण्याकरिता तयारी चालू आहे . त्यांचे मित्रपरिवार शिवा पुन्हा एकदा त्याची दृष्टी देण्याकरिता सर्व परिश्रम घेत आहेत याकरिता समाजातून अशा युवकाला मदत करण्यासाठी नक्कीच सर्वांचे हात पुढे येतील अशी अपेक्षा करून ज्या कुणाला सहकार्य करायचा असेल त्यांनी श्री पवन धामणेकर (9901650788) यांच्याशी संपर्क साधून त्यांना आर्थिक मदत करू शकता.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*