LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Education News

*जैन इंजिनिअरिंग अँड रिसर्च कॉलेजमध्ये राष्ट्रीय तांत्रिक-सांस्कृतिक ‘सविष्कार २०२५’ उत्सवाचे आयोजन*

बेळगाव :
बेळगावातील जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (JCE&R) मध्ये १२ आणि १३ नोव्हेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय स्तरावरील ‘सविष्कार २०२५’ तांत्रिक-सांस्कृतिक उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे प्राचार्य व संचालक डॉ. एस. व्ही. गोरबाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या दोन दिवसीय उत्सवात देशभरातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार असून, त्यांच्या तांत्रिक कौशल्य, सर्जनशीलता आणि सांस्कृतिक प्रतिभेचा भव्य संगम या महोत्सवात पाहायला मिळणार आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन बेळगावचे कायदा व सुव्यवस्था उपपोलीस आयुक्त एन. व्ही. भरमणी यांच्या हस्ते होणार असून, अध्यक्षस्थानी डॉ. एस. व्ही. गोरबाळ राहणार आहेत.

⚙️ ‘सविष्कार २०२५’चे आकर्षण:

या उत्सवात रोबो रेस, कोड ब्रेक, पेपर प्रेझेंटेशन यांसारख्या तांत्रिक स्पर्धांसह क्रिकेट, ट्रेझर हंट, मॉक सीआयडी आणि कॉर्पोरेट कार्निवल अशा मनोरंजक उपक्रमांचाही समावेश आहे.
तसेच सांस्कृतिक विभागात रॅम्प वॉक, सोलो आणि ग्रुप डान्स, तसेच गायन स्पर्धा पार पडणार आहेत.

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाला जनरल चॅम्पियनशिप ट्रॉफी प्रदान केली जाणार आहे.

डॉ. गोरबाळ यांनी सांगितले की, “या भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयासोबतच एमबीए विभागाची सुरुवात करण्यात आली आहे.”

या प्रसंगी प्रा. प्रकाश सोवळकर, कार्तिक रामदुर्ग, राघवेंद्र कटगल्ल आदी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*