एंजल फाउंडेशन आयोजित मंगळागौर व नऊवारी फॅशन शो स्पर्धा मंगळवारी
बेळगाव: एंजल फाउंडेशन आयोजित मंगळागौर व नऊवारी फॅशन शो स्पर्धा मंगळवार दिनांक २६/११/२०२४ रोजी दुपारी ३ वाजता भडकल गल्ली येथील बनशंकरी मंदिरामध्ये संपन्न होणार आहे.
महिलांच्या गुणांना विशेष वाव देण्याकरिता व आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन केले जाते. दरवर्षी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने महिलां सहभाग घेत असतात. तसेच यावर्षी या स्पर्धेमध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमाला महिला स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित रहावे , असे आवाहन एंजल फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.