गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा संपन्न
शुक्रवार दिनांक 21/4/2022 रोजी अस्मिता क्रिएशन्स बेळगांव यांच्यातर्फे भरवण्यात आलेल्या गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत बेळगाव,संकेश्वर निपाणी,गोकाक,खानापूर येथून दीडशेहून अधिक वेगवेगळ्या वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला होता अंतिम फेरी प्रवेश केलेल्या प्रत्येक ग्रुप मधील टॉप टेन स्पर्धकांनी रसिक प्रेक्षकांना आपल्या गोड गळ्याने मंत्रमुग्ध करून टाकले. स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे –
वयोगट स्पर्धकाचे नाव
9 ते 15 कु .धन्या पाटील. प्रथम
कु. गौरी अंगडी . द्वितीय
कु. मानसी गेंजी तृतीय
कु. निधी गुडमेटी चवथा
कु. श्रद्धा सुतार पाचवा
कु. साहना पटगुंडी सहावा
वयोगट
16 ते 22 कु. स्वाती सुतार प्रथम
कु. दर्शन पदकी द्वितीय
कु. स्वाती किडदाळ तृतीय
कु. सृष्टी देसाई चवथा
कु. तेजस्विनी पाचवा
कु. श्रीनिधी पुंडे. सहावा
वयोगट
खुला गट सागर चंदगडकर प्रथम
कृष्णा कट्टिमनी द्वितीय
भाग्यश्री तृतीय
चन्नाप्पा यली चवथा
वैष्णवी सुतार पाचवा
वरील स्पर्धकांनी या स्पर्धेत आपल्या गायनाचे कौशल्य सादर करत प्रेक्षकांची मन जिंकत निवड समितीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले व बेस्ट व्हॉइस ऑफ बेलगामचे मानकरी ठरले बेळगाव मधील सागर चंदगडकर हा या स्पर्धेतील गोल्डन व्हॉइस ऑफ बेलगाम या किताबाचा मानकरी ठरला.
या स्पर्धेत प्रसिद्ध संगीत शिक्षिका चंद्रज्योती देसाई,संतोष सुतार व रूपा वस्त्रद यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अस्मिता क्रिएशन्स चे संस्थापक राजेश लोहार व त्यांचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी अस्मिता क्रिएशन्स चा आगामी चित्रपट दडपण चे ट्रेलर रिलीज करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून एंजल फाउंडेशनच्या मीना बेनके कॅप्टन गिरीश केशव रेवणकर ठळकवाडी हायस्कूलचे भातकांडे सर व दडपण चित्रपटाचे मुख्य अभिनेते शशिकांत नाईक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दडपण चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक संतोष सुतार यांनी केले.