“दडपण” मराठी चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अस्मिता क्रीएशन प्रस्तुत “दडपण” मराठी चित्रपट बेळगाव मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी दिली. सदर पत्रकार परिषद लोकमान्य रंगमंदिर मध्ये पार पडली.
दडपण चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे बेळगाव मध्ये करण्यात आले आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सर्व कलाकार हे बेळगाव चे आहेत. विद्यार्थांनी कोणत्याही दडपणाखाली येऊन आत्महत्या करू नये तसेच ते आत्महेपासून कशा प्रकारे परावृत्त होऊ शकतात हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे.
तसेच पालकांनी सुद्धा आपल्या मुलांवर दडपण घालू नये आपल्या भरमसाठ अपेक्षा मुलांवर लादू नये असा संदेश या मराठी चित्रपटात देण्यात आला आहे.
या चित्रपटाचे निर्माते राजेश लोहार आहेत. तर चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन संतोष सुतार ,यांनी केले असून प्रमुख भूमिकेत वेदांत पाटील याने काम केले आहे. त्याशिवाय शशिकांत नाईक, निधी राऊळ, गगनदीप कुरळे ,अनिकेत हेरेंजल ,प्रशांत शब्बन्नवर आणि रोहित सुतार यांनी काम केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
तसेच हा चित्रपट बेळगावातील ग्लोब आणि प्रकाश या चित्रपट गृहात लवकरच प्रदर्शीत होणार असून हा चित्रपट सर्वांनी पाहावा असे आवाहन करण्यात आले आहे.