2000 नोट बंदी संदर्भात महत्त्वाची सूचना
सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याकरिता बँकेने पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी दिले आहेत त्यांनी या नोटा बदलून घेण्याकरिता चार महिन्याची बाब असल्याने नागरिकांनी कोणतीही घाई करू नये नोटा बदलून घेण्यासाठी भरपूर वेळ आहे असे सांगितले आहे.
त्यावेळी ते म्हणाले की 2000 ची नोट आणण्यामागे अनेक कारणे होती आणि धोरण अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले. नागरिकांनी जुन्या नोटा बदलण्यावरील बंदी गांभीर्याने घेतली तर चांगले होईल त्याकरिता त्यांना चार महिन्यांचा अवधी देण्यात आला असून बँकांनाही सामान्य नागरिक यांच्या नोटा बदलून घेण्याची सूचना दिली आहे.
चार महिन्याचा अवधी हा खूप मोठा आहे त्यामुळे नागरिकांनी कोणतीही घाई गडबड करून बँकेमध्ये गर्दी करू नये आपल्याला मिळेल त्या वेळेमध्ये 2000 च्या नोटा बदलून मिळतील असे सांगितले आहे.
तसेच 500 रुपयांच्या आणखीन नोटा चलनात आणण्याचा निर्णय जनतेच्या मागणीवर अवलंबून असेल असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.