पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले आहे काल त्यांनी हिराबेन यूएन मेहता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला पहाटे साडेतीन वाजता उपचारादरम्यान हिराबेन मोदी यांचे निधन झाले
तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद येथील रुग्णालयात आपल्या आईची भेट घेऊन विचारपूस केली होती. त्यांनी त्यांच्या आईच्या निधनानंतर ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. अलीकडेच म्हणजे चार डिसेंबर रोजी गांधीनगर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली आई हिराबेन यांची भेट घेतली होती तसेच या काळात त्यांच्याशी गप्पाही मारल्या होत्या आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेतला होता.
मात्र आता त्यांच्या शंभराव्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. तसेच त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेनऊ वाजता अंत्यसंस्कार देखील करण्यात आले आहेत. आप्तेष्ट मित्र मंडळ आणि नातेवाईक उपस्थित होते.