जाएंटस मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ
बेळगाव – जाएन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 19 रोजी सायंकाळी सहा वाजता वेंगुर्ला रोड येथील मधुरा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला आहे. जाएंट्स मेन च्या नूतन कार्यकारणी वतीने आगामी काळात विविध प्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत,अशी माहिती जाएंट्स मेन चे नूतन अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी पुढे बोलताना यलाप्पा पाटील म्हणाले, उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांच्यासह जाएंट्स सेंट्रल कमिटीचे सदस्य दिनकर अमीन,स्पेशल कमिटी सदस्य गजानन निलकारी तसेच जाएंट्स फेडरेशन 6 अध्यक्ष तेजस्वर राव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला भाऊराव काकडकर महाविद्यालयाचे प्राचार्य,डॉक्टर एस एन पाटील वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत असेही पाटील यांनी सांगितले. मुकुंद महागावकर यांनी यावेळी ज्यांच्या कार्याची माहिती दिली.
जाएंट्स मेनच्या नूतन कार्यकारणीत अध्यक्षपदी यल्लाप्पा पाटील याचबरोबर उपाध्यक्ष अरुण काळे व लक्ष्मण शिंदे,डायरेक्टर ऑफ फायनान्स मधु बेळगावकर, संचालक वर्गात अरविंद देशपांडे,विनोद आंबेवाडीकर, भास्कर कदम, राहुल बेलवलकर, अजित कोकणे, गोविंद टक्केकर,आनंद कुलकर्णी,दिगंबर किल्लेकर, प्रकाश तांजी,सुनील चौगुले,शरद पाटील, प्रदीप चव्हाण आदींचा समावेश आहे.
पुढील काळात जाएंट्स मेन च्या वतीने देहदान, नेत्रदान, त्याचबरोबर अवयव दान यासारख्या उपक्रमांबरोबरच गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत तसेच अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही यलाप्पा पाटील यांनी सांगितले. यावेळी शिवराज पाटील यांच्यासह,जाएंट्स मेनचे नूतन कार्यकारणी सर्व सदस्य उपस्थित होते.