बेळगाव: तालुक्यातील कंग्राळी बुद्रुक गावची ग्रामदैवत श्री महालक्ष्मीदेवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रुप डान्ससाठी १२००० ₹ पहिले बक्षीस तर ७००० ₹ हजार व सोलो वरिष्ठ (मोठा)गटासाठी ११०००₹ पहिल्या क्रमांकाचे बक्षीस तर ५००० ₹ दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस तर सोलो कनिष्ठ (लहान)गटासाठी ६००० ₹ रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस तर ४००० ₹ द्वितीय क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले असून एकूण ४५,००० रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
याकरिता प्रवेश फी ५०० ₹ रुपये ठेवण्यात आली आहे.
ही स्पर्धा २८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ठीक ८ वाजता कंग्राळी बुद्रुक येथील चव्हाटा सर्कल येथे घेण्यात येणार आहे.याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी संपर्क
अभिषेक अँथोनी 8971639837, नवनाथ पुजारी 7411985214, उमेश पाटील 8884472755