चंद्रयान 3 च्या उड्डाण मध्ये खानापूरच्या सुपुत्राचे मोठे योगदान
देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाणाऱ्या क्षणात चंद्रयान तीन च्या उड्डाणा मध्ये खानापूरच्या मराठ्यामोळ्या सुपुत्राचे मोठे योगदान लाभले आहे.
त्यामुळे खानापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे. आज दुपारी भारताकडून चांद्रयान तीन हे दुपारी पण वाजून 35 मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावते आहे हा देशवासीयांसाठी मोठा अभिमानाचा क्षण आहे तसाच तो आपल्या बेळगावसाठी देखील ठरला आहे.
कारण आपल्या बेळगाव मधील खानापूर तालुक्यातील आणि अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकांचा यामध्ये हातभार लागला आहे. आणि चंद्रयान दोन मध्ये देखील सहभाग घेतला होता.
आता त्याला पुन्हा चंद्रयान तीन मध्ये संधी मिळाली असल्याने ही खानापूर वासियांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. त्याचबरोबर प्रत्येक भारतीयाला आपल्या वैज्ञानिकांचा या उड्डाणामुळे अभिमान वाटत आहे तसेच या क्षणाची सर्व भारतीय आतुरतेने वाट पाहत आहेत.