लंडनमधील स्पर्धेत बेळगावची सुकन्या ठरली मिस आशिया
बेळगाव प्रतिनिधी लंडन येथील भारतीयांनी प्रतिवर्षी प्रमाणे यंदा एजीएलपी इंटरप्रेजेस यांनी आयोजित केलेल्या ” मिस आशिया जी.बी.2023″ मध्ये बेस्ट कॅट्वाक,बेस्ट टॅलेंट,आणि पीपल्स चॉईस अवार्डचे टायटल मिळवून आर्या नाईक ने सहाव्या फेरीमध्ये ” मिस आशिया जी.बी.2023″ हा मुकुट पटकाविला.
आर्या सध्या लंडन येथील बर्ण माउथ युनिव्हर्सिटी मध्ये मार्केटिंग अँड पी.आर. हा अभ्यासक्रम करीत असून ,मागच्या आठवड्यात दुसरे वर्ष संपले आहे.एक वर्ष प्लेसमेंट आणि दुसऱ्या वर्षात पदवी पूर्ण होणार आहे.
आर्या ही लंडन स्थित भारतीय श्री.विनीत नाईक यांची कन्या, ‘बेळगाव समाचार ‘ या साप्ताहिकाचे संस्थापक कै. प्रभाकर परुळेकर यांची पणती, तसेच भरतेश इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता पाटील यांची भाची होय.
5rl83y
lypro3
ryc7j0
ldboqx
lgjgjk
ojrulq
oum4k4
k8yidd
4hjy21
jpz7ff
ipbfzv