भारतामध्ये 24 तासात 227 कोरोना रुग्ण आढळले
चीन जपान ब्राझील आणि दक्षिण कोरिया मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर भारतामध्ये देखील याची चिंता वाढली आहे. त्यामुळे भारतामध्ये कोणाला कोरोनाची लागण झाले आहे का हे शोधण्यासाठी गेल्या 24 तासात 1 लाख 29 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
या 24 तासात भारतात कोरोनाचे 227 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना बांधितांची रुग्णसंख्या सध्या ३४२४ वर आली आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने सध्या घबराटीचे वातावरण पसरले आहे.
मात्र असे असले तरी त्यातून सुद्धा दिलासादायक बाप समोर आली आहे. या 24 तासात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याबरोबरच गेल्या 24 तासात 186 कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या देशातील दोन अब्ज वीस कोटी होऊन अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नसले तरी सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या आणि वाढवणे याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्या बैठकीचं आयोजन सुरू आहे या बैठकीत कोरोनावर मात करण्यासंदर्भात कशाप्रकारे नियोजन करायला हवे याबद्दल सक्रिय झाले असल्याचे दिसून येत आहे.