बेळगाव ता, 30. माळमारूती येथील लव्हडेल शाळेच्या स्पोर्टिंग प्लॅनेट टर्फ मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा व संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती राज्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला
स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, उद्योजक ओमकार देसाई,राजेंद्र भातकाडे., विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, संत मीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार अनुराधा पुरी उपस्थित होते प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात आले किरण जाधव यांच्या हस्ते ओमकार देसाई यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी किरण जाधव व ओमकार देसाई यांनी खेळाचे महत्व व सध्या भारत खेळासाठी खेलो इंडियाच्या माध्यमातून युवा व युवकांना जे प्रोत्साहित करत आहेत त्याचा फायदा खेळाडूंनी घ्यावा व शाळेचे राज्याचे व देशाचे नाव नावारूपास आणावे असे सांगितले याप्रसंगी पच मानस नायक आदित्य सानी, स्वरूप हलगेकर, प्रणव देसाई,हर्ष रेडेकर, देवेश मटकर, सोहल विजापुरे, श्रेयस खांडेकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा कामत व प्रेमा मेलीनमनी यांनी आभार मानले.
