LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Crime News

*दहा वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी अंत; कौटुंबिक वादातून हत्या*


मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी हेगडे या धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लिगवाड गावच्या रहिवासी होत्या. त्यांचा विवाह बैलहोंगल तालुक्यातील विठ्ठल हेगडे यांच्याशी सुमारे दहा वर्षांपूर्वी झाला होता. रोजगाराच्या निमित्ताने हे दाम्पत्य बेळगाव शहरात स्थायिक झाले होते. त्यांना दोन मुले आहेत.

गेल्या काही काळापासून पती-पत्नीमध्ये विविध कारणांवरून वाद होत असल्याचे सांगण्यात येते. विठ्ठल हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात वारंवार मतभेद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

आजारी सासऱ्यांसाठी जेवण घेऊन आल्या अन् घडली दुर्घटना

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर अश्विनी आपल्या माहेरी गेल्या होत्या. आजारी असलेल्या सासऱ्यांना जेवण देण्यासाठी त्या घरी आल्या असताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे.

यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विठ्ठलने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्याशी वाद घातला. हा वाद वाढल्यानंतर त्याने अश्विनी यांच्यावर गंभीर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या आईने केला आहे.

सणाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे.

पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी; पतीला अटक

घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. अश्विनी यांच्या हत्येप्रकरणी विठ्ठल हेगडे याला अटक करण्यात आली असून, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा अशा प्रकारे दुर्दैवी शेवट झाल्याने दोन मुलांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आईचे छत्र हरपल्याने या मुलांच्या संगोपनाबाबत नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

D Media News | बेळगाव

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वैशाली सुतार यांच्या नियुक्तीचा सन्मान; विश्वकर्मा मनु-माय संस्थेतर्फे सत्कार**'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..' - महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ**दहा वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी अंत; कौटुंबिक वादातून हत्या**वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून; भरत दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम**सीबीएसईचा अभ्यास होणार अधिक सोपा! ज्योती सेंट्रल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकांकडून कौतुक**मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार!**अनगोळमध्ये ‘होम मिनिस्टर २०२६’ स्पर्धेचा उत्साह; पुष्पा सुतार ठरल्या विजेत्या, सफाई कर्मचाऱ्यांचाही सन्मान*म्हैसूर दसरा महोत्सवात स्वाती पाटीलचा डंका! राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते गौरव*डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांच्या हृदयविकार प्रबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड**कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान वधाचा इतिहास! दुर्गामाता दौडीतील बॅनरवरून आमदार अभय पाटील यांची भूमिका*