LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून; भरत दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम*


बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानचे तालुकाध्यक्ष भरत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाचा आनंद गरजू मुलांसोबत वाटून घेत महेश फाउंडेशन येथे अनाथ मुला-मुलींसाठी दिवसभराच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तसेच नंदन मकळ धाम येथे अनाथ मुला-मुलींना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

यावेळी संघटनेचे कार्यकर्ते आणि त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाढदिवस केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता गरजू मुलांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्यात आल्याने या उपक्रमाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.

गोशाळेतील गाईंनाही केळींचा घास

भरत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री भगवान महावीर गोशाळेतील गाईंना केळी खाऊ घालण्यात आली. या उपक्रमातून मुक्या प्राण्यांप्रती प्रेम आणि सेवाभाव व्यक्त करण्यात आला.

अनाथ मुलांसाठी भोजनाची व्यवस्था, गरजू मुलांना आवश्यक वस्तूंचे वाटप आणि गोशाळेतील गाईंना खाद्य देणे अशा विविध उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला.

या वेळी संघटनेचे कार्यकर्ते आणि कुटुंबीयांनी एकत्रित सहभाग नोंदवला. समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात देत माणुसकीची भावना जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

D Media News | सामाजिक उपक्रम

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*वैशाली सुतार यांच्या नियुक्तीचा सन्मान; विश्वकर्मा मनु-माय संस्थेतर्फे सत्कार**'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने..' - महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या ग्रंथालयाचा शुभारंभ**दहा वर्षांच्या संसाराचा दुर्दैवी अंत; कौटुंबिक वादातून हत्या**वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून; भरत दादा पाटील यांचा स्तुत्य उपक्रम**सीबीएसईचा अभ्यास होणार अधिक सोपा! ज्योती सेंट्रल स्कूलच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे पालकांकडून कौतुक**मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार!**अनगोळमध्ये ‘होम मिनिस्टर २०२६’ स्पर्धेचा उत्साह; पुष्पा सुतार ठरल्या विजेत्या, सफाई कर्मचाऱ्यांचाही सन्मान*म्हैसूर दसरा महोत्सवात स्वाती पाटीलचा डंका! राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते गौरव*डॉ. निखिल पंत बाळेकुंद्री यांच्या हृदयविकार प्रबंधाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड**कर्नाटक सरकारच्या पाठ्यपुस्तकात अफजलखान वधाचा इतिहास! दुर्गामाता दौडीतील बॅनरवरून आमदार अभय पाटील यांची भूमिका*