बेळगाव : जिल्हास्तरीय ‘जय गणेश श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांचा बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्स तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
‘जय गणेश श्री’ या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनासाठी अनिल बेनके यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी बेनके यांचा पुष्पगुच्छ व सत्कार करून गौरव करण्यात आला.
या प्रसंगी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर असोसिएशन अँड स्पोर्ट्सचे सचिव राजेश लोहार, अनिल आंबरोळे, सुनील बोकडे, बाबू पावशे, नारायण चौगुले आणि शिवाजी पाटील यांच्यासह विविध शरीरसौष्ठवपटू उपस्थित होते.
तसेच मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे आनंद अपटेकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. स्पर्धेच्या माध्यमातून शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडूंना व्यासपीठ मिळत असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.









