बेळगाव तारीख 04 मराठी विद्यानिकेतन शाळेच्या मैदानावर सेट झेवियस स्कूल आयोजित चव्हाट गल्ली फुलबाग गल्ली क्लस्टरच्या प्राथमिक मुलाच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स शाळेने बलाढ्य सेटपाल्स शाळेचा पेनल्टी शूटआउटवर पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात सेंटपाल्स हायस्कूलने मराठी विद्यानिकेतन शाळेचा 2-0 असा पराभव केला दुसऱ्या उपात्य सामन्यात सेंट झेवियर्स शाळेने महिला विद्यालय शाळेचा 1-0 असा पराभव केला अंतिम लढतीत बलाढ्य सेटपाल्स स्कूलला 4-3 असा पेनाल्टी शूटआउटवर नमवित सेंट झेवियर्स शाळेने विजेतेपद पटकाविले विजयी संघाच्या कर्णधार अनिकेत पाटील, फौजांन शेख,श्री राजगोळकर, मानव शिंदे यांनी गोल केले.
आता हा संघ आगामी होणाऱ्या तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा आयोजन शाळेचे सचिव ज्युलेट फर्नांडिस, नागराज भगवतण्णावर, प्रकाश बजत्री साकीब बेपारी, रवी मालशेट या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेला पंच म्हणून महेश हगीदळी दत्ता पाटील, इम्रान बेपारी, मानस नायक मॅन्युअल डिक्रुझ उपस्थित होते
