Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव*

मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव
दिनांक 23/01/2026व 24/01/2026 या दोन दिवशी मराठी विद्यानिकेतन बालवाडी विभागाचा क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा झाला. पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून कन्नड विषयाचे शिक्षक सुरेश कुंदेकर तर दुसऱ्या दिवशी क्रीडा शिक्षक श्रीधर बेन्नाळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वज फडकवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा महोत्सवाचे प्रतीक म्हणून मुलांना वाघ,सिंह आणि गरुड या प्राण्यांचे चित्र असणारे बॅच देण्यात आले. शिशुवर्ग खेळ गटाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योतीचे संचलन करून क्रीडा ज्योत पाहुण्यांच्या हाती सुपूर्द केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतामध्ये मोबाईल पासून दूर राहून उत्तम आरोग्यासाठी मैदानी खेळ खेळावेत असे मार्गदर्शन केले. क्रीडा महोत्सवामध्ये खेळ गटाच्या ‌पालकांचा उत्साही सहभाग दिसून आला.
माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी.पाटील, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर, शैक्षणिक समुपदेशक गौरी चौगुले उपस्थित होते.

शिक्षण संयोजिका नीला आपटे व शिक्षक समन्वयक सविता पवार , शिक्षक , बालवाडी शिक्षिका भारती शिराळे, अश्विनी हलगेकर ,वरदा देसाई, नयन परमोजी ,प्रतिभा चौथे, तेजश्री हंडे ,श्रद्धा पावशे, सुनिता पाटील यांचे विशेष परिश्रम लाभले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बालवाडी शिक्षिका रेणू पवार यांनी केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*