कै. अनुप कोरवी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्पणा काबळे, विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. अनुप यांचे वडील दत्तात्रय आप्पा कोरवी, काका विलास आप्पा कोरवी आणि भाऊ नागराज दत्तात्रय कोरवी यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.
यावेळी संयुक्त श्रीराम सेना, गडहिंग्लजचे अध्यक्ष अमोल रमेश कोरवी, महाकाल सेना, कडगावचे अध्यक्ष प्रसाद ताडे, पत्रकार व निवेदक मेघराज हट्टी, कट्टा ग्रुपचे वैभव ठोंबरे, टायगर ग्रुपचे गडहिंग्लज तालुकाध्यक्ष कुमार शिंदे, वुमन राइट्सचे विकास दिवटे, सौरभ कोरी, ओमकार इंदूलकर, विघ्नेश दळवी, बाळू जाडे, पवन आणि अमोल कोरवी यांच्यासह मित्रपरिवारातील सदस्य उपस्थित होते.
मनमिळाऊ स्वभावाच्या आठवणींना उजाळा
कार्यक्रमात उपस्थितांनी अनुप यांच्या मनमिळाऊ स्वभावाचे आणि मित्रांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांचे स्मरण केले. त्यांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
दिवंगत मित्राच्या आठवणी जपण्याबरोबरच समाजासाठी विधायक कार्य करण्याचा निर्धारही मित्रपरिवाराने व्यक्त केला. गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे आणि समाजोपयोगी उपक्रम राबविणे, यातून अनुप यांच्या स्मृती कायम जिवंत ठेवता येतील, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
पत्रकार व निवेदक मेघराज हट्टी आणि महाकाल सेनेचे अध्यक्ष प्रसाद ताडे यांनीही अनुप यांच्या आठवणींना उजाळा देत सर्व मित्रांनी एकत्र येऊन चांगले सामाजिक कार्य करण्याची भावना व्यक्त केली.
विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिवंगत मित्राला आदरांजली अर्पण करण्याचा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलता आणि मैत्रीतील जिव्हाळा अधोरेखित करणारा ठरला.
D Media News | गडहिंग्लज

