Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*रोटरी महिला क्रिकेट प्रीमियर लीग २०२६ उत्साहात संपन्न*


बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव साऊथ आणि रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली रोटरी महिला क्रिकेट प्रीमियर लीग २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात आणि खेळाडूवृत्तीच्या उत्कृष्ट प्रदर्शनासह यशस्वीरित्या पार पडली.

या स्पर्धेत पाच रोटरी क्लबच्या महिला संघांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेतील सर्व सामने अत्यंत चुरशीचे झाले असून महिला सक्षमीकरण, संघभावना आणि रोटरी मैत्रीचे दर्शन घडले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम संघाने विजेतेपद पटकाविले, तर रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंट्रल संघ उपविजेता ठरला.

समारोप समारंभाला डीजीएन रोटेरियन अशोक नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सौ. मधुरा भाटकांडे आणि सौ. स्वाती उपाध्ये या मान्यवर पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

यावेळी मान्यवरांनी महिला खेळाडूंचे कौतुक करताना क्रीडा क्षेत्रातील सहभागामुळे नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी वृद्धिंगत होत असल्याचे प्रतिपादन केले.

स्पर्धेचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. संजीव नाईक तर सह-अध्यक्ष रोटेरियन अजिंक्य पित्रे यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहभागी संघ, प्रायोजक, पंच, स्वयंसेवक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले.

विजेत्या आणि उपविजेत्या संघांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे रोटरी कुटुंबातील ऐक्य, मैत्री आणि महिला सक्षमीकरणाचा संदेश अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात शांताई वृद्धाश्रमाच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन; 28 वर्षांच्या सेवेला नवे बळ*विद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशी**धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकार*धोबी घाट समुदाय भवनाच्या रखडलेल्या कामाला अखेर सुरुवात; आमदार असिफ सेठ यांचा पुढाकारविद्यार्थ्यांनी साकारले विठ्ठल-रुक्माई रूप; मराठा मंडळात भक्तीमय आषाढी एकादशीNEET वादानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाला मोठे यशबेळगावमध्ये आंदोलनासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी अनिवार्य; आयुक्तांचा स्पष्ट इशारापावसाळा सुरू तरी चव्हाट गल्लीत पाण्याचा प्रश्न कायम, नागरिकांचा संतापकामत गल्लीतील आगग्रस्तांना आर्थिक सहाय्य; मृगेंद्रगौडा पाटील यांचा संवेदनशील पुढाकार*बेळगावात दोन अल्पवयीन दुचाकी चोर पोलिसांच्या ताब्यात*