बेळगाव | प्रतिनिधी
दलित समाजाचे नेते मल्लेश चौगुले यांची कर्नाटक स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (KSIIDC) येथे स्टेट डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीमुळे सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मल्लेश चौगुले यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले कार्य, विविध विषयांवरील त्यांची भूमिका तसेच नेतृत्वगुण यांची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.
KSIIDC ही कर्नाटकातील औद्योगिक व पायाभूत सुविधांच्या विकासाशी संबंधित महत्त्वाची संस्था आहे. अशा संस्थेच्या स्टेट डायरेक्टरपदाची जबाबदारी मिळाल्याने चौगुले यांच्या कार्याला नवे व्यासपीठ मिळाले आहे.
नवीन पदावर कार्यरत होताना औद्योगिक विकास, पायाभूत सुविधा आणि राज्याच्या विकासाशी संबंधित कामांमध्ये प्रभावी योगदान देण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
मल्लेश चौगुले यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच त्यांच्या समर्थक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या.

