LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News | Education News

*ज्योती सेंट्रल स्कूलच्या टेकी ब्रेन्सची AI स्पर्धेत चमक*

 

   दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे दिनांक 6 नोव्हेंबर 2026 रोजी शालेय प्राचार्य श्री प्रदीप पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली AI इनोव्हेटिव्ह स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी शाळेतील दैनंदिन समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नाविन्यपूर्ण उपाय सादर करून आपल्या टेकी ब्रेन्सची चुणूक दाखवली.

      या स्पर्धेसाठी ज्योती कॉलेजच्या

 बी.सी.ए.विभागातील लेक्चरर्स मिस प्रार्थना आणि मिस मयुरी यांनी निर्णायक म्हणून काम पाहिले, तर या स्पर्धेत ग्रीन हाऊसच्या मास्टर रोहित, मास्टर वेदांत आणि मिस रिद्धी यांनी हजेरी, शैक्षणिक प्रगती, संवाद, वाहतूक व विद्यार्थी कल्याण या सर्वांचा समावेश असलेले ‘गुरुकुल अ‍ॅकॅडमिक पोर्टल’ सादर केले. तर रेड हाऊसच्या इयत्ता 10 वीच्या मास्टर श्रवण, मिस पल्लवी आणि मिस देवी यांनी CBSE च्या विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन अभ्यास नियोजन, 10 वर्षांचे प्रश्नपत्रिका संच, हिंट-बेस्ड लर्निंग आणि गणित-विज्ञानसाठी शंका निरसनाची सुविधा असलेले ‘नीव JCS’ हे AI पॉवर्ड अ‍ॅप सादर केले. ब्ल्यू हाऊसच्या इयत्ता 9 वीच्या मास्टर हर्ष प्रदीप पाटील, मास्टर मृणांक आणि मास्टर नील यांनी शाळेतील सुरक्षितता, शिस्त, स्वच्छतागृहांचा योग्य वापर व देखभालीसाठी सेन्सर व AI चा वापर या विषयावर तर यलो हाऊसच्या मास्टर पार्थ, मास्टर श्लोक आणि मास्टर दक्ष यांनी ‘प्रागस्थ्य’ हा NCERT आधारित अ‍ॅकॅडमिक सूट प्रोजेक्ट सादर करून परीक्षकांची वाहवा मिळवली.

      या सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांनी सादर केलेले विषय अत्यंत सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण होते. याबद्दल शालेय एस्.एम्.सी. चेअरमन प्रा. श्री. आर. के. पाटील, व्हाईस चेअरमन प्रो. श्री. आर. एस्. पाटील, सेक्रेटरी प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील आणि उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन केले.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*ज्योती सेंट्रल स्कूलच्या टेकी ब्रेन्सची AI स्पर्धेत चमक*कंग्राळी बी.केत बाल संभाजी युवक मंडळाचा अनोखा उपक्रम; किल्ले श्री हुंदेरीचा देखावा साकारला*पाटील माळ्यात नाला-ड्रेनेज कामांना सुरुवात; 1.50 कोटींचा निधी मंजूर*स्कायवर्ल्ड एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची भरारी; गोवा विमानतळावर 8 विद्यार्थ्यांची निवड*कणबर्गीतील श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम उत्साहात**सोनोलीच्या मराठी शाळेचा कायापालट; 43.44 लाखांच्या नूतनीकरणानंतर नूतन इमारतीचे उद्घाटन**वैशाली शिंदे यांना पीएचडी प्रदान; भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या शैक्षणिक लौकिकात भर**मराठी फलक हटविण्यावर म. ए. समिती आक्रमक; पोलिसांना अधिकार कोणी दिला?**लक्ष्मी टॉवरमध्ये कचरा विलगीकरणाची जनजागृती; चार स्वतंत्र डस्टबिनचा वापर करण्याचे आवाहन**कियान अनाथाश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर फुलले दिवाळीचे हास्य; रोटरी क्लबतर्फे नवीन कपड्यांचे वाटप*