Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*डीवायईएस कर्नाटककडून बेळगावच्या ज्यूडो खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव*

कर्नाटक सरकारच्या युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग (DYES) यांच्या वतीने 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार समारंभ बेंगळुरू येथील नृपतुंगा रोडवरील राज्य युवा केंद्रात पार पडला. या समारंभात बेळगाव येथील ज्यूडो खेळाडू व प्रशिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागाचे आयुक्त श्री. आर. चेतन (IPS) होते. तर संयुक्त संचालक डॉ. जितेंद्र शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते ईशन, ऑलिम्पियन प्रमिला अय्यप्पा, ऑलिम्पियन हॉकीपटू सुनील, तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेतील कबड्डी पदक विजेत्या उषा राणी यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.

या सत्कार समारंभात NIS प्रशिक्षक रोहिणी पाटील व कुतुजा मुलतानी यांच्यासह राष्ट्रीय पातळीवर पदके मिळवलेल्या बेळगावच्या सहा ज्यूडो खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यात गंगय्या चिकमठ, श्वेता अलकनूरु, राधिका दुकारे, संजना शेट, वैष्णवी भडांगे आणि आलिया मुलतानी यांचा समावेश आहे.

हे सर्व खेळाडू डीवायईएस ज्यूडो सेंटर, बेळगाव येथे प्रशिक्षण घेत असून, उपसंचालक श्री. श्रीनिवास बी. यांच्या मार्गदर्शन व सहकार्यामुळे त्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होत आहेत.

या गौरव समारंभामुळे खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक मोठे यश मिळवण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*