Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय कुस्ती आणि ज्युडो स्पर्धेत डंका*

जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींचा राज्यस्तरीय कुस्ती आणि ज्युडो स्पर्धेत डंका

बेळगाव (प्रतिनिधी):
मराठा मंडळाच्या जिजामाता हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढवला आहे. शालेय व जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कुस्ती आणि ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

५७ किलो वजनगटातील कुस्ती स्पर्धेत सानिका हिरोजी हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले, तसेच जिल्हास्तरीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या कामगिरीमुळे तिला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळाली आहे.

६२ किलो वजनगटात श्रावणी तरळे हिने तृतीय क्रमांक मिळवत उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक मिळवला होता आणि तिचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

याचबरोबर, आरती मुरकुटे हिने जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.

या तिन्ही विद्यार्थिनींच्या यशामागे मराठा मंडळ अध्यक्षा सौ. राजश्री नागराजू यांचे प्रोत्साहन आणि मुख्याध्यापक एन. डी. पाटील व क्रीडा शिक्षिका अश्विनी पेटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेच्या क्रीडा कामगिरीबद्दल पालकवर्ग आणि शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थिनींनी शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचा मशाल मोर्चा; शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी**सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा.उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र*अथणीत धक्कादायक घटना; पत्नीवरील संशयातून झोपेत असलेल्या महिलेची हत्याज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम हायस्कूल वृत्त – शिवराज्याभिषेक सोहळा*बेळगाव कणबर्गी रोडवर बुडा विकास कामावर आक्षेप; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर काम थांबवले**अंकलीतून आळंदीच्या दिशेने माऊलींच्या मानाच्या अश्वांचा पवित्र प्रवास सुरू**हंदिगनूरमध्ये २० लाखांच्या वाल्मिकी समाज भवनाला प्रारंभ; भूमिपूजन संपन्न**मराठी विद्यानिकेतनमध्ये दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ**कोप्पळमध्ये भीषण अपघात; डिव्हायडर ओलांडून आलेल्या वाहनाच्या धडकेत तिघांचा मृत्यू**बेळगावात शेतकऱ्यांसाठी महाआरती; कपिलेश्वर मंदिरात होणार विशेष गाराणे*