LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

*बेळगाव उत्तरमध्ये जनता दरबार; नागरी प्रश्नांवर चर्चा*

बेळगाव :बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी केएचबी कॉलनी, बसवण कुडची, तहसीलदार गल्ली आणि बहादूर गल्ली परिसराला भेट देत जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी जनसुनावणी (जनता दरबार) आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

या जनता दरबारात नागरिकांनी रस्त्यांची दुरवस्था, गटारींची समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे आणि इतर नागरी सुविधांबाबतच्या अडचणी आमदारांसमोर मांडल्या.

नागरिकांच्या तक्रारी ऐकून आमदार आसिफ (राजू) शेठ यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आमदारांनी सांगितले की, लोकांमध्ये जाऊन त्यांच्या अडचणी प्रत्यक्ष समजून घेणे हे प्रभावी प्रशासनासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक भागातील नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा मिळणे आवश्यक असून, जनता दरबाराच्या माध्यमातून विकासकामांना स्थानिक गरजेनुसार दिशा मिळते.

परिसरातील नागरिकांनी आमदारांनी स्वतः भेट देऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रलंबित प्रश्नांवर लवकर कार्यवाही होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी स्थानिक नेते, नगरसेवक, नागरिक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*गोवा विधानसभा निवडणूक: AICC समन्वयक म्हणून मृणाल हेब्बाळकर यांची नियुक्ती बेळगावच्या युवा नेत्यावर काँग्रेस हायकमांडकडून महत्त्वाची जबाबदारी**शिक्षक-कवी परशराम एम. शिंदे यांच्या गीतसंपदेचे थाटात लोकार्पण! गणेशगीत, भावगीत, भक्तीगीत, लोकगीत आणि शेतकरी गीतांचा अल्बम गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला**धोऱ गल्लीत भीषण अग्निघटना; आमदार आसिफ सेठ यांनी पहाटेच घेतली घटनास्थळाची पाहणी*लष्करी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरण; MARATHA LIRC मध्ये गणेश चतुर्थी उत्साहात साजरीखानगावात जमिनीच्या वादातून मारामारी; एक जखमी*मराठी विद्यानिकेतनमध्ये किशोरावस्थेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन**सतीश जारकीहोळींवरील कारवाईमागे राजकीय हेतू?; आसिफ सेठांचा आरोप “वॉशिंग मशिन थिअरी सतीश जारकीहोळींवर चालणार नाही”; काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद नसल्याचा दावाही**रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग; लक्ष्मी हेब्बाळकरांकडून पाहणी सह्याद्रीनगरसह विविध भागांत सुरू असलेल्या कामांची पाहणी; निकृष्ट कामाला थारा न देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना*🌺 गणेशोत्सव २०२६ : ज्ञानाचा आणि भक्तीचा अनोखा संगम! 🙏🚩*बेळगाव ग्रामीणमध्ये वीजप्रश्नावर भाजप आक्रमक; पंत बाळेकुंद्री येथे रस्ता रोको २४ तासांत ७ ते ८ तास वीज खंडित होत असल्याचा आरोप; गणेशोत्सव मंडळांवरील ₹२२ हजारांच्या जोडणीच्या दबावाचाही निषेध*