बेळगाव :
बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कंचवीर नगर, मुतगा येथील ऐतिहासिक विहिरीला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कुटुंबासह विहिरीची माहिती घेत परिसराची पाहणी केली.
या भेटीदरम्यान प्यास फाउंडेशनचे चेअरमन डॉ. माधव प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह मुतगा गावातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर कालव्याच्या समस्येचा मुद्दा मांडला.
गावातील कालवा आरसीसी पद्धतीने विकसित करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
ऐतिहासिक वारसा असलेल्या विहिरीच्या संवर्धनाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. गावाच्या विकासासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी उमेश पुरी, कृष्णा पाटील, सूरज पाटील, परशराम केदार, लक्ष्मण रामजी, महावीर गुडाज, दीपक पुरी, कुणाल पाटील यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
गावातील समस्या समजून घेण्यासाठी भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी आभार मानले.
