LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Local News

॥ वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथालयाला पुस्तके भेट ॥

 

कंग्राळी खुर्द - या गावातील तरुण अभियंते महेश मल्लू मोहनगेकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून गांवातीत ग्रंथालयाला कांदबरया , सामान्य ज्ञान व कथा संग्रह अशी पुस्तके भेट दिली . या त्यांच्या विधायक उपक्रमाचे शिक्षण प्रेमी नागरिकांतून कौतुक होत आहे .

या निमीत्ताने गावातीत सरकारी ग्रंथालयात झालेल्या कार्यक्रमांत प्रारंभी टी.डी पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून प्रत्येकाने आपल्या वाढदिवसा निमीत्त असे विधायक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले .त्यानंतर महेशचे वडील मल्लू मोहनगेकर यांचे हस्ते ग्रंथपाल मधू पाटील यांचेकडे पाणिपत , ययाती , छावा , स्वामी विवेकानंद यासारख्या कादंबर्या , स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान पुस्तके , इंग्रजी स्पीकिंग कोर्स , छ.शिवाजी महाराज यांचे सहकारी 10 विर मावळे यांचे चरीत्र ग्रंथ व बोधकथा या सारखी जवळपास दहा हजाराची पुस्तके सुपूर्त केली . तसेच छ शिवाजी महाराज यांच्या नित्य पुजेसाठी रु 1111 / रूपये ही देणगी दाखल दिले . मनोगत व्यक्त करताना त्यानी या वेळी पुस्तकांचा वापर शालेय विद्यार्थ्यासह गावातील तरुण पिढीने करावा असे आवाहन करत यापुढे आम्ही परिवाराच्या वतीने सतत पुस्तके व शैक्षणिक साहित्य भेट देत राहू असे सांगितले यावेळी मराठी शाळा प्र .मुख्या गोपाळ लाड यांनीही मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले . यावेळी मा सदस्य प्रशांत पाटील , एसडीएमसी अध्यक्ष विक्रम मुतगेकर व त्यांचे सहकारी , मनोज मोहनगेकर मराठी शाळेतील शिक्षक , विद्यार्थी व शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते . ग्रंथपाल मधू पाटील यांनी ग्रंथालय शालेय विद्यार्थ्याना अभ्यासासाठी रात्री 9 पर्यंत खुले राहिल त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करून धन्यवाद देऊन आभार मानले .

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*भारतीय हॉकीचा बेळगांवात विजयोत्सव**बेळगावचे ९ मास्टर जलतरणपटू आशियाई स्पर्धेसाठी सज्ज; ४ ऑक्टोबरपासून बंगळुरूत रंगणार चॅम्पियनशिप**संत मीरा शाळेच्या समर्थ बेकवाडकरची राज्य स्पर्धेसाठी निवड*वाढदिवसानिमित्त राहुल जारकीहोळी यांची अनोखी भेट; दोन बिबटे आणि एका सिंहाला घेतले दत्तकबेळगावात मटका अड्ड्यावर एपीएमसी पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, ₹2,252 जप्त*खानापूरच्या उत्कर्ष पाटीलची आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कामगिरी**बेळगावात ‘शेतकरी कृतज्ञता दिन’ उत्साहात; शेतकरी व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान**दुष्काळ दौऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर सीमाप्रश्नाचा मुद्दा; बेळगाव-खानापूरच्या युवा शिष्टमंडळाला भेटण्याचे आश्वासन**मराठा मंडळ सेंट्रल हायस्कूलच्या 7 खेळाडूंची राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड* 🌸 रजोनिवृत्ती जागरूकता व आरोग्य सत्र – कित्तूर 🌸