दिनांक २६नोव्हेंबर रोजी येथील मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात
आला.यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील समाज विषय शिक्षिका सरिता बांदेकर उपस्थित होत्या.यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.सरिता बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली.इयत्ता सातवीचे विद्यार्थी श्रीशैल बाबाजी गुरव व भार्गवी दत्तात्रय पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो, कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने भारतीय संविधानाचा औपचारिक स्वीकार केला. हे संविधान २६ जानेवारी १९५० पासून संपूर्ण देशात अंमलात आले.संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांचा प्रसार करणे, नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची जाणीव करून देणे आणि डॉ. आंबेडकरांच्या योगदानाचा सन्मान करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.अशा शब्दात यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमासाठी शिक्षण संयोजिका नीला आपटे, प्राथमिक विभागाचे प्रमुख बी.जी.पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन्.सी. उडकेकर, शिक्षक समन्वयक सविता पवार, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

