LIVE TV LocalCrimeNationalInternationalPoliticsEducationEntertainmentSportsHealthBeauty
Press & Media Credential Portal
✕
1. Apply for Press ID Card
Register official reporter application with Email OTP.
➔
2. Download Approved Badge
Enter Card ID to receive authorization code via email.
3. Verify Reporter ID & Card (View Only)
For Public & Police: Check if card is authentic.
Local News

*हिंडलगा स्पोर्ट्स क्लबच्या मॅरेथॉनचा उत्साह; १० जानेवारीला रंगणार धावण्याचा थरार*

हिंडलगा | प्रतिनिधी

आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत हिंडलगा स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेच्या बॅनरचे अनावरण उत्साहात करण्यात आले. १० जानेवारी २०२७ रोजी होणाऱ्या या स्पर्धेच्या बॅनरचे अनावरण गोकुळ दूध उत्पादक सहकारी संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन तथा चंदगड तालुक्याचे माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हिंडलगा हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष निवृत्त कर्नल मोहन नाईक अध्यक्षस्थानी होते. यावेळी राजेश पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना राजेश पाटील यांनी हिंडलगा परिसरात गेल्या काही वर्षांपासून मॅरेथॉनसारख्या उपक्रमाचे सातत्याने आयोजन होत असल्याचे कौतुक केले. अशा स्पर्धांमुळे नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्यासोबतच आरोग्याबाबत जागरूकता वाढते, असे त्यांनी नमूद केले. गोकुळ दूध संघाच्या चेअरमनपदाची नवी जबाबदारी स्वीकारल्यानंतर संस्थेचा लौकिक आणखी व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात शिवशाहीर व्यंकटेश देवगेकर यांच्या गणेश प्रार्थनागीताने झाली. प्रास्ताविक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले. यावेळी उद्योजक परशराम काकतकर, पॅसिफिक एंटरप्राइजचे मोहित शर्मा, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अशोक कांबळे, सामाजिक कार्यकर्ते मनोज हित्तलमनी, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका साधना हंबूरकर, निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेला शुभेच्छा देताना निवृत्त स्टेट बँक व्यवस्थापक अरुण नाईक आणि एस. आर. पाटील यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात निवृत्त कर्नल मोहन नाईक यांनी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन वेळापत्रकातून किमान एक तास व्यायामासाठी राखून ठेवण्याची गरज व्यक्त केली. नियमित व्यायाम, शुद्ध हवा, स्वच्छ पाणी आणि पौष्टिक आहार या गोष्टी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मॅरेथॉनमध्ये विविध गटांचा समावेश
यंदाची स्पर्धा ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा स्वरूपात आयोजित केली जाणार आहे.
३ किमी फन रन युवा-युवतींसाठी खुली ठेवण्यात आली आहे.

५ किमी शर्यतीत १८ वर्षांखालील, १८ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील असे विविध वयोगट करण्यात आले आहेत.

१० किमी शर्यत युवा-युवतींसाठी खुली असून १८ ते ३५, ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५६ वर्षांवरील असे चार गट आहेत.

विविध गटांतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिकांसह स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र देण्यात येणार आहे. मागील वर्षी या मॅरेथॉनला तब्बल ११०० स्पर्धकांचा सहभाग मिळाला होता. यंदाही मोठ्या संख्येने धावपटू सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

इच्छुक धावपटूंनी हिंडलगा स्पोर्ट्स क्लबशी संपर्क साधून आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शरणकुमार लिंबाळे यांच्या सीमाप्रश्नी वक्तव्यावरून संताप; युवा समितीकडून जाहीर माफीची मागणी*बेळगावात ‘संविधान समर्पण दिन’ उत्साहात; डॉ. आंबेडकर उद्यानात संविधानाची प्रतिज्ञा**कर्नाटकातील मराठा समाजाच्या एकजुटीसाठी व्यापक संघटनात्मक मोहीम; फेब्रुवारीत भव्य पुरस्कार सोहळा**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेसाठी बेळगांवच्या 55 स्केटिंग पटूची 20 व्या जिल्हा स्पर्धेतून निवड**शुभम शेलके-मनोज हुंदरे यांना सशर्त जामीन; महिनाभरानंतर कारागृहातून सुटकेचा मार्ग मोकळा**हिंडलगा स्पोर्ट्स क्लबच्या मॅरेथॉनचा उत्साह; १० जानेवारीला रंगणार धावण्याचा थरार**बेळगावसह खानापूर तालुक्यातील अनेक गावांत 26 नोव्हेंबरला पाच तास वीजपुरवठा बंद**‘ईठा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी श्रद्धा कपूर कोल्हापुरात; अंबाबाईचे घेतले दर्शन**अधिवेशनाच्या कामांच्या टेंडरवरून वाद; स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याचा अभय पाटील यांचा आरोप**भारतीय लष्कराच्या जवानांसाठी 87 अॅप्सवर निर्बंध; Facebook, Snapchat, PUBGसह अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश*