Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Health & Fitness

*कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी*

कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेत पालकांसाठी आरोग्य तपासणी

कॅम्प येथील कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेच्या वतीने शाळेच्या पालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर लेक व्हू हॉस्पिटल त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटल यांच्या सहकार्याने पार पडले. या शिबिरात डोळे तपासणी, बी.पी.मधुमेह,हाडांची तपासणी इत्यादी तपासण्या मोफत करण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या ऑडिटर मॅरीलीन कोरिया,शाळेचे ब्रँड अँबेसिडर समाजसेवक संतोष दरेकर, शाळेचे मुख्याध्यापक पी. एस.बिर्जे,लेक व्हू हॉस्पिटल व नेत्रदर्शन आय हॉस्पिटलचे कर्मचारी,शाळेचे शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

या आरोग्य तपासणी शिबिराला पालकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून त्याचा लाभ घेतला. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी लेक व्हू हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर व सिईओ डॉक्टर गिरीश सोनवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रूपाश्री मगदूम,मार्केटिंग हेड दीपा मोदगेकर,गौतम खानपेठ, कपिल भोसले त्याचबरोबर नेत्रदर्शन आय हॉस्पिटलचे व्यवस्थापक श्री.उदयकुमार, टेक्निशियन मंजुनाथ इंगळे, आदित्य अलगुडेकर,मिस सबा व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
महिला PSIच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; हिंडलगा कारागृहाची बदनामी केल्याचा आरोपअगसगा गावात आयुष्मान आरोग्य केंद्राचे भूमिपूजन; ५५ लाखांच्या कामाला सुरुवात*बेळगाव महापालिकेची नवी सुविधा; झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी अत्याधुनिक यंत्राची खरेदी**वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.