बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो चे स्केटर्स राज्यस्तरीय खुल्या रँकिंग स्केटिंग 2026 बंगलोर आणि तुमकुर मधील स्केटिंग स्पर्धेत सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये 200 च्या वर टॉप स्केटिंग पटू सहभाग घेतला होता या स्पर्धेत बेळगांव च्या स्केटर्स नी चमकदार कामगिरी करत 7 सुवर्ण,
1 रौप्य,2 कांस्य , अशी 9 पदके जिंकली
पदक विजेते स्केटर्स खालील प्रमाणे
हिरेन राज 1 सुवर्ण ,1 कांस्य
मनन अंबिगा 1 कांस्य
रश्मीता अंबिगा 2 सुवर्ण
जय ध्यान राज 1 सुवर्ण,1 रौप्य
साईराज मेंडके 2 सुवर्ण
या स्केटर्स ना के एल ई सोसायटी स्केटिंग रिंक व गुड शेफर्ड स्केटिंग रिंक,शिवगंगा स्पोर्ट्स क्लब वर प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर ,विठ्ठल गंगणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ येळ्ळूरकर सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत असून या सर्वांना पद्मश्री डॉ प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, इंदुधर सीताराम सेक्रेटरी कर्नाटक रोलर स्केटिंग असो याचे प्रोत्साहन मिळत आहे
