Advertisement
LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes
Sports News

*बेळगावच्या जलतरणपटूंची राज्यस्तरावर चमकदार कामगिरी; 10 पदकांची कमाई*

मंगळुरू येथील येम्मेकेरे जलतरण तलावात 3 ते 5 जुलै 2026 दरम्यान कर्नाटक स्विमिंग असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या NRJ राज्य सब-ज्युनियर जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत स्विमर्स क्लब बेळगावच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत एकूण 10 पदकांची कमाई केली. यामध्ये 2 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे.

राज्यभरातील हजारहून अधिक गुणवंत जलतरणपटूंनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने वेगळा ठसा उमटवला.

पदक विजेते खेळाडू
आरोही चित्रागर
200 मीटर बटरफ्लाय – सुवर्ण
200 मीटर इंडिव्हिज्युअल मेडले – रौप्य
50 मीटर बटरफ्लाय – रौप्य
100 मीटर बटरफ्लाय – कांस्य
श्लोक जाधव
100 मीटर बॅकस्ट्रोक – सुवर्ण
50 मीटर बॅकस्ट्रोक – रौप्य
वेदांत मिसाळे
100 मीटर बटरफ्लाय – रौप्य
200 मीटर बटरफ्लाय – रौप्य
50 मीटर बटरफ्लाय – कांस्य
तन्वी पाई
100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक – कांस्य

या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर श्लोक जाधव आणि वेदांत मिसाळे यांची 6 ते 9 ऑगस्ट 2026 दरम्यान राजस्थानमधील जयपूर येथे होणाऱ्या सब-ज्युनियर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.

हे सर्व खेळाडू बेळगावमधील KLE सुवर्ण JNMC ऑलिम्पिक आकाराच्या जलतरण तलावात उमेश कळघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुदुचकर आणि गोवर्धन काकतकर यांच्या प्रशिक्षणाखाली सराव करत आहेत.

या यशामागे KLE संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, जयभारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी तसेच विविध पदाधिकाऱ्यांचे आणि हितचिंतकांचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन व सहकार्य लाभल्याची भावना क्लबकडून व्यक्त करण्यात आली.

Author
D Media 24
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
महिला PSIच्या अश्लील व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; हिंडलगा कारागृहाची बदनामी केल्याचा आरोपअगसगा गावात आयुष्मान आरोग्य केंद्राचे भूमिपूजन; ५५ लाखांच्या कामाला सुरुवात*बेळगाव महापालिकेची नवी सुविधा; झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी अत्याधुनिक यंत्राची खरेदी**वडगावात शेतकऱ्यांची महत्त्वाची बैठक; बेळ्ळारी नाल्याच्या पूरस्थितीवर ठोस निर्णयाची तयारी**बेळगावात पावसात वृद्ध आंदोलकांसाठी पोलीस आयुक्तांचा माणुसकीचा हात**श्री तुकाराम को-ऑपरेटिव्ह बँकेची ७५ वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न**दिल्लीमध्ये आमदार अभय पाटील यांच्या कारला भीषण अपघात; इनोव्हा-स्विफ्टची धडक, सर्वजण सुखरूप**राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बेळगांव चा सर्वेश पाटील ची चमकदार कामगिरी**श्री राजमाता महिला बहुउद्देशीय सोसायटीची 33 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत*विद्याभारती  राज्यस्तरीय मलखांब स्पर्धेला प्रारंभ.